Breaking News

आसोली येथील डॉ,बाबासाहेब आंबेडकर पटांगणात अतिक्रमण

आसोली येथील डॉ,बाबासाहेब आंबेडकर पटांगणात अतिक्रमण

 ग्रामपंचायतीने बजावली नोटीस परंतु अतिक्रमण धारकांची दादागिरी सुरुच


महा घड़ामोडी न्यूज़ नेटवर्क गोंदिया : गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत आसोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक पटांगणावर येथील काही विध्वंसक कृत्ये करणाऱ्या लोकांनी अतिक्रमण केले असून ते अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे अशी मागणी येथील युवकांनी ग्रामपंचायत आसोला येथे केली होती. त्यानुसार ग्रामपंचायत आसोला यांनी 19 ऑक्टोंबर 2020 ला ग्रामपंचायत ठराव घेऊन ज्या विध्वंसक लोकांनी अतिक्रमण केले त्यांना अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस बजावली. परंतु त्यांनी आजपर्यंत अतिक्रमण काढले नाही. त्याउलट तारांचे कंपाउंड करून त्या जागेवर आपला हक्क गाजवत आहेत .या करिता दिनांक 24 मार्च 2022  ला ग्रामपंचायत येथे विशेष सभा घेण्यात आली याबाबत येत्या 15 दिवसात अतिक्रमण काढण्यात येईल असे संबंधित सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी पत्रकारांशी संवाद करताना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत