Breaking News

वाचक मित्र पुरस्कार देऊन वाचन चळवळीला गती देणाऱ्यांचा सन्मान

वाचक मित्र पुरस्कार देऊन वाचन चळवळीला गती देणाऱ्यांचा सन्मान



महा घड़ामोडी न्यूज तालुका प्रतिनिधि बालाजी सुवर्णाकार,उदगीर : वाचाल तर वाचाल हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी  प्रयत्नशील असणारे स्वतः वाचन करत वाचक संवाद वृद्धिंगत करण्यासाठी योगदान देणाऱे दै.राजधर्मचे अंबादास आलमखाने यांना वाचक मित्र पत्रकार पुरस्कार तर अर्चना पैके व गोविंद भूरे यांना वाचक मित्र रसिक पुरस्कार आणि बालाजी सुवर्णकार  व राजेंद्र  एकंबेकर आणि वर्षाराणी चव्हाण यांना वाचक मित्र शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
        चला कवितेच्या बनात या चळवळीच्या वतीने संयोजक अनंत कदम , प्रा. डॉ. बाळकृष्ण संदीकर, ग्रंथमित्र दीपक बलसूरकर,  तथा भातंब्रे,निवृत्ती रायवाड यांच्या उपस्थितीत वाचक संवाद कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत