प्रा. डॉ. भास्कर ठुबे यांना बाळासाहेब ठाकरे पुरस्कार प्रदान
प्रा. डॉ. भास्कर ठुबे यांना बाळासाहेब ठाकरे पुरस्कार प्रदान
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, पारनेर : कान्हूरपठार, ता. पारनेर येथील प्रा. डॉ. भास्कर कृष्णाजी ठुबे यांना मा. बाळासाहेब ठाकरे बृहन्मुंबई आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चेंबूर (मुंबई) येथील महात्मा ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे ते प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. ते कान्हूरपठार येथील जनात विद्या मंदिर विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.
श्री. ठुबे यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना नुकताच चारकोप कांदिवली येथे झालेल्या शिक्षक महोत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, समाजसेवक विपुल दोशी, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव शेंडगे, अक्षर साहित्य व कला मंचचे संस्थापक दिनेश गायकवाड आदी उपस्थित होते.
प्राचार्य भास्कर ठुबे यांची उपक्रमशील शिक्षक, आणि अभ्यासू व्यक्तिीमत्व म्हणून ओळख आहे. 2017 साली श्री. ठुबे यांना रोटरी क्लब मुंबई तर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत