Breaking News

वडगाव सावताळ येथील कुस्ती स्पर्धा ठरल्या लक्षवेधी

वडगाव सावताळ येथील कुस्ती स्पर्धा ठरल्या लक्षवेधी

कुस्तीच्या माध्यमातून ग्रामीण भागात खेळाडूंना प्रोत्साहन देणार : भाऊसाहेब डी. शिंदे

भाऊसाहेब डी. शिंदे यांची बक्षिसांची खैरात..


 महा घडामोडी न्युज नेटवर्क, पारनेर : तालुक्यातील वडगाव सावताळ येथील बनाई देवी यात्रा उत्सव साजरा झाला या उत्सवादरम्यान भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात आले होते. जिल्ह्यातून व तालुक्यातून या ठीकाणी पैलवानांनी हजेरी लावली डोळ्यांचे पारणे फेडणार्‍या नेत्रदीपक कुस्त्या या मैदानात पाहायला मिळाल्या. पहिलवानांवर यावेळी बक्षिसांची खैरात करण्यात आली. प्रथम क्रमांक बक्षीस २१ हजार, द्वितीय क्रमांक बक्षीस १८ हजार, तृतीय क्रमांक बक्षीस १६ हजार, चतुर्थ क्रमांक बक्षीस १६ हजार, पाचवे बक्षीस १० हजार व विविध बक्षिसे यावेळी ठेवण्यात आली होती. 



या कुस्ती स्पर्धे दरम्यान ज्येष्ठ नेते मा सरपंच भाऊसाहेब डी. शिंदे वडगाव सावताळचे सरपंच बाबासाहेब शिंदे, यात्रा कमीटीचे अध्यक्ष अर्जून रोकडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल गायकवाड, माधव लोंखडचूर, गोरक्ष रोकडे गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य‌ सर्जेराव रोकडे, सेवा सोसायटी चेअरमन दादाभाऊ रोकडे, गुलाब अण्णा रोकडे, खजिदार राजेद्रं भोसले, वस्ताद सखाराम भोबाळ, मंगेश रोकडे, संदीप खंडाळे, उत्सव कमीटी अध्यक्ष कर्ण रोकडे सर, हनुमंत ठाणगे मेजर, गुलाब शिंदे साहेब, राजेद्रं बा. रोकडे, पै रवी शिंदे, पै योगेश शिंदे, पै रंजीत रोकडे, सतिश तिखोळे, संदिप निकम, गोरक्ष लोखंडचूर, आप्पा रोकडे, संदिप रोकडे, सत्यवान शिंदे, पै किरण सरोदे, संदिप व्यव्हारे, शिवाजी रोकडे, गणेश खंडाळे, सुनिल खामकर, एन एम रोकडे गुरूजी, वामन ठानगे, पै दादाभाऊ जांभळकर, बबन रोकडे, दत्ता सरोदे, बाबासाहेब लोखंडचूर, पै राहुल खंडाळे, ज्ञानदेव खामकर, पै अक्षय खंडाळे, युवा नेते योगेश रोकडे, भाऊ शिंदे, योगेश व्यव्हारे, पै गणेश शिरतार, पै गणेश रोकडे, पै नारायण खंडाळे, भाऊसाहेब रोकडे, आदिनाथ पायमोडे, सुनिल रोकडे, मगेश खामकर, केतन ठानगे, पै भिमराज रोकडे, गणेश खामकर, उतम रोकडे, प्रकाश रोकडे, बाळासाहेब रोकडे, पोपट रोकडे, सुनिल नाबगे, दादाभाऊ रोकडे, सतीश गायकवाड, प्रमोद गायकवाड, राहुल शिंदे, सुनील शिंदे, निवृत्ती शिंदे, अविनाश शिंदे, राजू शिंदे, अशोक शिंदे, नंदू शिंदे, मंजबापू शिंदे, सुरज पवार, अमोल शिंदे, विशाल पवार, रामदास गांगुर्डे, दीपक शिंदे, सुनील पवार, जय बेर्डे, कुणाल वाघ, प्रदीप भोपाळ, स्वप्नील शिंदे, आदि मान्यवर व ग्रामस्थ तसेच कुस्ती शौकीन यावेळी उपस्थित होते. 


भाऊसाहेब डी. शिंदे यांची बक्षिसांची खैरात..
बनाई देवी यात्रा उत्सवानिमित्त आयोजित भव्य कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवानांवर बक्षिसांची खैरात करण्यात आली. यावेळी जेष्ठ नेते मा. सरपंच भाऊसाहेब डी. शिंदे यांनी पहिलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यावर बक्षिसांची खैरात केली. यावेळी जिल्ह्यातून व तालुक्यातून मोठ्या संख्येने पैलवान कुस्ती हंगाम्यासाठी उपस्थित होते. 

कुस्ती हा मातीतला खेळ असून कुस्ती या खेळाला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळाले पाहिजे ग्रामीण भागामध्ये अनेक जातिवंत दर्जाचे पहिलवान असून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी वडगाव सावताळ येथे बनाई देवी यात्रा उत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते ग्रामीण भागातील खेळाडूला प्रोत्साहन मिळाले पाहिजे यापुढील काळात खेळाडूंना संधी मिळण्यासाठी आम्ही विविध स्पर्धांचे आयोजन करणार आहोत. 
भाऊसाहेब डी. शिंदे,ज्येष्ठ नेते मा. सरपंच वडगाव सावताळ
बनाई देवी यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी भव्य कुस्ती स्पर्धेचे वडगाव सावताळ येथे आयोजन करण्यात आले. मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात बनाई देवी यात्रा उत्सव साजरा झाला. 
अर्जुन रोकडे,अध्यक्ष : बनाई देवी यात्रा उत्सव कमिटी, वडगाव सावताळ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत