Breaking News

बदलत्या हवामानात कोरपना तालुक्यात शेतकऱ्यांचा बांबू लागवडीकडे कल

बदलत्या हवामानात कोरपना तालुक्यात शेतकऱ्यांचा बांबू लागवडीकडे कल


महा घडामोडी न्यूज नेटवर्क चंद्रपूर ; वाढते तापमान वायू प्रदूषण यामुळे शेतकऱ्यांमध्ये परंपरिक पिक उत्पादन घटत असल्याने आर्थिक नियोजन कोलमडले आहे शेतीमध्ये मजुरांचा अभाव खतं औषधी बियाणाचे वाढते दर यामुळे शेती परवडत नाही अशी ओरड सर्वत्र होत असताना कोरपणा येथे सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनी यांनी शेतकरी संवाद कार्यक्रम वसंतराव नाईक विद्यालय सभागृहात आयोजित केला होता यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते भविष्यात पेट्रोल डिझेल वाढते दर व न परवडणारा प्रवास यासाठी पर्याय म्हणून भविष्यात इथेनॉल वाढणारी मागणी भारतामध्ये केंद्र शासनाने रिफायनरी साठी सकारात्मक प्रयत्न यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कागद कारखाना थर्मल पावर स्टेशन सिमेंट उद्योग यामध्ये भविष्यात कोळसा ऐवजी ग्रीन कोल वापरसाठी बांबूच वापर वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगतीसाठी बांबू हा पर्याय असल्याने बांबू लागवडीकडे वळण्याचे आव्हान पुथ्वी रक्षक समितीचे आबिद अली सिल्वर स्टोन चे संचालक श्रीनिवास मुसळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले कोरपना येथील अनेक शेतकऱ्यांनी बांबू लागवडीची तयारी दर्शवून येत्या हंगामात बांबू लागवड करण्याचा निर्धार केला हवामानामध्ये कार्बन ऑक्साईड चे वाढते प्रमाण ही पृथ्वीवरील मानव व जीव-जंतू ला घातक असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान चिंतनाची बाब आहे शेतकऱ्यांनी बांबू मुळे पर्यावरणाचे संतुलन राखण यामध्ये अत्यंत महत्त्वाचे भूमिका करणार आहे यामुळे जमिनीची धूप थांबविण्यास व भूगर्भातील पाणी पातळी टिकवण्यासाठी बांबू लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे अनेक शेतकऱ्यांनी बांबू पासून अनेक वस्तू निर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांसाठी बांबू पीक वरदान ठरणार आहे यावेळी संचलन अजर खान यांनी आभार कृष्णा कुबडे यांनी मानले मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत