Breaking News

पिंपळनेर येथील भगवान विश्वकर्मा कलशारोहन सोहळा अति उत्साहात संपन्न

पिंपळनेर येथील भगवान विश्वकर्मा कलशारोहन सोहळा अति उत्साहात संपन्न 


महा घडामोडी न्यूज नेटवर्क,पारनेर ; पारनेर येथील श्री तीर्थ क्षेत्र पिंपळनेर कलश रोहन व पूजन सोहळा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व मुंबई उच्य न्यायालय वकील मंगेश भालेकर सपत्नीक मनीषा भालेकर मुबई पोलीस तसेच  यांच्या हस्ते पार पडला. 

 

आज सकाळी पिंपळनेर येथील भगवान विश्वकर्मा  मंदिरास काशीची घंटा व कलश देऊ केले या मंदिराचे कलश ची विधिवत पूजा  मुंबई उच्य न्यायालय नामंकित वकील मंगेश भालेकर व सापत्नीक  मनीषा भालेकर यांच्या हस्ते करून कळसाची गावातील मुख्य बाजापेठेतून मंदिरापर्यंत भव्य अशी हजारोंच्या उपस्थितीत मिरवणूक करण्यात अली असून,ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते भालेकर कुटुंबीयांचा सत्कार केला असून यावेळी वडिलोपार्जित समाजसेवा पिढीनं पिढी समाजसेव करण्याचं वसाच हे कुटूंब घेत असे.

 

समाजामध्ये तरुण पिढी व तरुणांनी आपले आयुष्य जगता जगता समाजाचे आपणही काही देणं या यथोचित ऋण देऊ करू अशी मानसिकता ठेवून सर्वानी बांधिलकी जपली पाहिजे, असे भालेकर यांच्या कडून सांगण्यात आले. 


यावेळी उपस्तित  पोलीस उपनिरीक्षक सोनवणे साहेब दिवेकर साहेब मंदिराचा कामाला चालना देणारे मधुकर भालेकर दत्तात्रय शिरसागर पिंपळनेर व पिंपळनेर पंचक्रोशीतील उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित होते पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील मान्यवरही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत