राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दक्षिण पश्चीम जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दक्षिण पश्चीम जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी सतीश भालेराव,नागपूर : जातीतील मी पणा कमी करुन आम्ही ओबीसी ही ओळख जोपर्यंत निर्माण करणार नाही तोपर्यंत सरकार ओबीसी ची दखल घेणार नाही. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दक्षिण. पश्चिम जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांचे हस्ते पार पडतांना उपस्थित ओबीसी बांधवांना हे आवाहन केले. पाहुण्यांच्याहस्ते दिप प्रज्वलन करून सचिव रमेश नाईक यांच्या सोबतीने डॉ. तायवाडे ह्यांचे हस्ते जनसंपर्क कार्यालयाची फीत कापण्यात आली.
या प्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय सचिव शरद वानखेडे, राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुभाष घाटे, शहराध्यक्ष राजेश रहाटे, महिला शहराध्यक्ष वृंदताई ठाकरे, प्रदेशाध्यक्ष कल्पनाताई मानकर, दक्षिण पश्चिम चे अध्यक्ष ललित देशमुख यांची उपस्थिती होती.
१९५२ ला एससी एसटी प्रमाणे ओबीसी समाजाला संविधानिक हक्क आणि अधिकार मिळावयास पाहिजे होते. परंतु ओबीसी मध्ये स्वतः ची ओळख निर्माण राज्यकर्त्यांनी केली नाही त्यामुळे ओबीसी समाज आज अनेक क्षेत्रांत मागे आहे, यांची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न राष्ट्रीय ओबीसी महासंघ देशात करीत आहे असे सार्वजनिक मत उपस्थित पाहुण्यांनी केले. या जनसंपर्क कार्यालयासाठी रमेश नाईक यांनी स्वतः ची जागा देउन ओबीसी समाजाप्रती निष्ठा व्यक्त केली सर्वांनी त्यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले,
या माध्यमातून ओबीसी च्या योजना, महाज्योती च्या योजना, आणि सभासद नोंदणी चे कार्य केले जाणार आहे. या साठी शहराचे पदाधिकारी सुधाकर तायवाडे, हेमंत गावंडे, टीपरे साहेब, अनिता ठेंगरे, उदय देशमुख, नंदा देशमुख, श्रीमती नाईक आणि कुटुंबातील सर्वांनी सहकार्य केले तसेच श्रीमती नाईक यांना महीला विंग मध्ये पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली शेवटी ओबीसी अनिल नाईक यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत