Breaking News

वाळू तस्करांचा एसडीओंच्या पथकावर हल्ला

वाळू तस्करांचा एसडीओंच्या पथकावर हल्ला

एसडीओ जखमी, वाहनाच्या काचा फोडल्या

पवनी तालुक्याच्या बेटाळाची घटना


महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी नरेंद्र मेश्राम,भंडारा : कारवाईसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या (एसडीओ) पथकावर वाळू तस्करांनी हल्ला केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील बेटाळा येथे बुधवारी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास घडली असून यात एसडीओ जखमी झाले असून त्यांच्या वाहनाच्या काचाही फोडण्यात आल्या आहे. आता या प्रकरणाची पवनी ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

 

  भंडाराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्याकडे रेती तस्करीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावरुन बुधवारी पहाटे ते तलाठी, पोलीस कर्मचारी असलेल्या पथकासह पवनी निलज रस्त्यावर वाहनाने गेले. पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास रेतीचे चार-पाच टिप्पर एकापाठोपाठ येताना दिसले असता टिप्परला थांबविण्याचा इशारा केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही अंतरावर बेटाळाजवळ टिप्पर अडविला गेला.काही कळायच्या आता 15 ते 20 तस्करांनी हातात काठ्या व दगड घेऊन हल्ला केला.


 यात उपविभागीय अधिकारी राठोड जखमी झाले असुन वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहे. या प्रकाराची माहिती पवनी पोलिसांना देण्यात आली होती पोलीस घटनास्थळी दाखल झाले खरे मात्र तो पर्यंत तस्कर पसार झाले होते. लागलीच पवनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्यात आली असुन एसडीओंना पवनीच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 


विशेष म्हणजे लाखनी तालुक्याच्या पालांदूर परिसरात दोन दिवसापूर्वी तहसीलदारांच्या पथकांवर रेती तस्कारांनी लाठ्याकाठ्या घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता,त्यात दोन तस्करांना अटकही करण्यात आली होती
आता थेट एसडीओंच्या पथकावर हल्ला करण्यात आल्याने या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत