Breaking News

वरसुबाई यात्रा उत्सवाच्या निमित्ताने बैलगाडा शर्यतीचे आयोजन

वरसुबाई यात्रा उत्सवाच्या निमित्ताने बैलगाडा शर्यतीचे आयोजन 

न्यायालयाच्या परवानगीने तब्बल एकशे दहा बैलगाडा मालकाचां सहभाग


महा घडामोडी न्युज नेटवर्क, पुणे : जांभोरी ता.आंबेगाव येथे न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर प्रथमच वरसुबाई यात्रा उत्सवाच्या निमित्ताने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये तब्बल एकशे दहा बैलगाडा मालकांनी सहभाग घेतल्याची माहिती बैलगाडा कमिटीचे अध्यक्ष तानाजी शेळके यांनी दिली.



   बैलगाडा शर्यतीचे उदघाटन सुरेश केंगले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदचे माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे,आदिवासी समाजाचे युवा नेते मारुती दादा केंगले माजी उपसभापती सलीमशेठ तांबोळी, सरपंच संजय केंगले, यात्रा कमिटी अध्यक्ष विठ्ठल पारधी, पोलिस पाटील नवनाथ केंगले, ग्रामविकास फाऊंडेशनचे उपाध्यक्ष दिलीप गिंरंगे, सुरेश केंगले, किसन पारधी आदी मान्यवर उपस्थित होते.


   बैलगाडा शर्यतीमध्ये घाटाचा राजा होण्याचा मान नवनाथ केंगले यांच्या गाड्याने पटकाविला. बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक कुरवंडी गावचे प्रसिद्ध गाडामालक लक्ष्मण तुकाराम मते, द्वितीय क्रमांक घोटवडी, ता. खेड येथील दामु तुकाराम धंदरे (११.२६ सेकंद) व तृतीय क्रमांक वाडा, ता. खेड येथील दामु बारकु सुपे या गाडा मालकांनी पटकाविला. बैलगाडा शर्यतीचे संपूर्ण नियोजन लिंबाजी केंगले यांनी केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत