Breaking News

कळमना फाट्यावरील चहा टपरी चालवणाऱ्या युवकास अज्ञात कारणावरून चाकूने मारहाण

कळमना फाट्यावरील चहा टपरी चालवणाऱ्या युवकास अज्ञात कारणावरून चाकूने मारहाण



महा घडामोडी न्यूज नेटवर्क,नागपूर : बेला गावाबाहेरील कळमना फाट्यावरील चहा टपरी चालवणाऱ्या युवकास अज्ञात कारणावरून चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना येथे घडली. चंदू पांडुरंग सावरकर असे जखमी युवकाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास चंदू आपल्या चहा टपरीवर होता. त्यावेळी आरोपी युवराज बापूराव नौकरकर आला व त्याने चाकूने जोरदार हल्ला केला. काही कळायच्या आतच त्याचेवर त्याने चाकूने सपासप घाव घातले. यामुळे चंदू रक्ताच्या थारोळ्यात पडला.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे आसपास असलेले ग्राहक घाबरून  
पळून गेले. कुणीही तत्काळ चंदूला दवाखान्यात नेण्याची व्यवस्था केली नाही. पण काही वेळानंतर चंदूच्या ओळखीतील लोकांनी हिंमत करून बेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने त्याला तातडीने मेडिकलमध्ये भरती केले.

आता चंदूची प्रकृती स्थिर आहे. मात्र धोका अद्यापही टळलेला नाही. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेतील आरोपी युवराज नौकरकर याने हल्ल्यानंतर स्वतःच्या हाताला चाकू मारून घेतला आणि तो पोलिस ठाण्यात गेला. पोलिसांनीही मग सोपस्कार पार पाडत त्याला अटक केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत