पंचशील बुद्ध विहार लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न
पंचशील बुद्ध विहार लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न
डॉ.राजरत्न आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष यांनी केले सामाजिक संबोधन
हजारो च्या संख्येने बौद्ध उपासक/ उपासंकाची उसळली गर्दी
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,सुखसागर झाडे,गडचिरोली गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील एक छोटसं गावं म्हणजे मुधोली रिठ सुशिक्षित नौकरदार पेक्षाचं माहेर घर म्हनून गडचिरोली जिल्ह्यात प्रसिद्ध मुधोली रिठ या गावाचं नावलौकिकास आहे.या गावातील प्रत्येक घरातील कमीत कमी एक तरी व्यक्ती शासकीय नौकरीतून देश सेवेत कार्यरत आहे. मोठमोठ्या हुद्द्यावर विराजमान झाले आहेत.
एवढे सारे जन या जन्मभुमीतून स्वतः चे अस्तित्व निर्माण केले परंतु या गावात बौद्ध विहाराची कमी असल्याची खंत त्यांच्या हृदयात घर करून होती. त्या सर्वांनी वाट्सअॅप गृप तयार केला. त्यात सामाजिक बांधिलकीची जाणीव करून स्वखुशीय लोकवर्गणीतून बौद्ध स्तुप व वाचनालय उभारणी केली आहे. असे मत प्रास्ताविकेतून त्याच जन्मभूमीचे विरसुपुत उप शिक्षणाधिकारी दिपक देवतळे यांनी मांडले.
या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ.राजरत्न आंबेडकर साहेबांनी बुद्धाचा धम्म मानवी जीवनात किती महत्वाचा आहे. भारतातचं नाही तर विश्वात स्वतः ची ओळख अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी बुद्धांच्या धम्माची महत्त्ती पटवून दिली. शुद्ध आचरणा करीता प्रज्ञा शिल्लक करूणा असने महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले. अनेक उदाहरणे देत बुद्ध उपासकांना संबोधीत केले.
राष्ट्रीय बुद्धिष्ट सोसायटी च्या माध्यमातून भविष्यात करण्यात येणाऱ्या कार्याची रुपरेषा मांडली. उपस्थित हिन्दू धर्मीय लोकांना समस्त समाजबांधवांना बौद्ध दिक्षा दिली डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांची पुर्तता करण्यासाठी आजीवन कटीबद्ध राहिल असे मत त्यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जन्मभूमी पुत्र धनराज तावडे मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य, विशेष अतिथी म्हणून डॉ. रोहिदास दुधे,राहुल धुरके,दिपक देवतळे उप शिक्षणाधिकारी, हंसराज वनकर, अशोक दुर्गे, जनार्दन वाळके तथा दिग्गज मान्यवर, व समस्त गडचिरोली जिल्ह्यातील तथा बाहेर जिल्ह्यातील बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत