लोखंडी सळाख चोरी करणारे चोरटे हिंगणघाट पोलीसांचे जाळ्यात
लोखंडी सळाख चोरी करणारे चोरटे हिंगणघाट पोलीसांचे जाळ्यात
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, वर्धा : फिर्यादी श्री आशिष अर्जुनलाल नागराळे, रा. विनोद वझे यांचे घरी, यशवंत कॉलनी, हिंगणघाट यांनी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे येवुन रिपोर्ट दिला कि, फिर्यादी हे रेल्वे ठेकेदाराचे साईड अभियंता असुन त्यांचे काम सुरु असलेल्या येनोरा रेल्वे स्टेशन हाऊसचे नवनिर्माणाधीन बांधकामासाठी आणलेल्या एकुण लोखंडी सळाखीपैकी १६ एम.एम. चे १९ सळाखींचे बंडल वजन अंदाजे ०२ टन किंमत प्रती टन ४३,०००/- रूपये प्रमाणे एकुण ८६.०००/- रूपयांचा माल दिनांक २०-०४-२०२२ चे १६.०० ते दिनांक २२-०४-२०२२ चे ११.०० वा दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरुन नेला. अशा फिर्यादीचे रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप. क्रमांक ५०३/२०२२ कलम ३७९ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याचे तपासात गुन्ह्यातील आरोपीचा शोध सुरु असतांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरुन आरोपी १) आकाश सुरेश राऊत, वय २४ वर्ष, २) गौतम गोपाल आत्राम, वय १९ वर्ष, दोन्ही रा. येनोरा यांना ताब्यात घेवुन त्यांना गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याचे ताब्यातुन १) १९ बंडल असलेल्या २ टन लोखंडी सळाखी किंमत ८६,०००/- रूपये, २) एक बोलेरो पिकअप मालवाहु गाडी क्रमांक एम.एच.- ३०/ ए.बी.-३९७९ किंमत ६,००,०००/- रूपये असा एकूण ६,८६,०००/- रूपयांचा माल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत सोळंखे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट श्री. दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. संपत चव्हाण यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि. सोमनाथ टापरे, बी.एस. मुंढे व पोलीस अंमलदार विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे, उमेश बेले सर्व नेमणुक पो.स्टे. हिंगणघाट यांनी केली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत