Breaking News

निव्वळ नाकर्तेपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे राज्यावर ही कृत्रिम वीज टंचाई निर्माण करण्याचे काम हे महाविकास आघाडी सरकार करत आहे - देवराव भोंगळे

निव्वळ नाकर्तेपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे राज्यावर ही कृत्रिम वीज टंचाई निर्माण करण्याचे काम हे महाविकास आघाडी सरकार करत आहे - देवराव भोंगळे



महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यावर ओढावलेल्या लोडशेडिंगच्या विरोधात चंद्रपूर जिल्हातील अनेक तालुक्यात आंदोलन करण्यात आले. भद्रावती शहरातील गांधी चौकात पार पडलेल्या कंदील आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे प्रामुख्याने उपस्थित होते. निव्वळ नाकर्तेपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे राज्यावर ही कृत्रिम वीज टंचाई निर्माण करण्याचे काम हे महाविकास आघाडी सरकार करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१२ साली १२ डिसेंबरला त्यांच्या काकांच्या म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी राज्याला भारनियमन मुक्त करण्याची घोषणा केली होती, आज त्यांचेच सरकार राज्यात असून या फसव्या सरकारने राज्यावर कृत्रिम भारनियमन लादण्याचे काम केले आहे. भद्रावतीत झालेल्या कंदील आंदोलनात देवराव भोंगळे राज्यसरकारच्या धोरणाविषयी निषेध व्यक्त करत जोरदार टीका केली.

 

कंदील आंदोलन चंद्रपुरातील अनेक तालुक्यात करण्यात आले त्यावेळी तालुक्यात कंदील आंदोलनाचे नेतूत्व राजुरा येथे माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, प्रशांत घरोटे अरूण मस्की, विनायक देशमुख तर बल्लारपूर येथे माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, आशिष देवतळे जिल्हाध्यक्ष भाजयुमो चंद्रपूर, शहर अध्यक्ष काशिनाथ सिंह. वरोरा येथे माजी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, तालुकाध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, शहराध्यक्ष सुरेश महाजन, पडोली येथे भाजयुमोचे प्रदेश सचिव अनिल डोंगरे, तालुका महामंत्री विजय आगरे पोंभुर्णा येथे अल्का आत्राम अध्यक्ष भाजपा महिला मोर्चा , अजय मस्के, नगराध्यक्ष सुलभा पिपरे, अजित मंगळगिरीवार, ईश्वर नैताम तर चिमूर येथे राजू झाडे गडचांदूर येथे माजी नगराध्यक्षा विजयलक्ष्मी डोहे, सतिश उपलंचिवार, अरूण डोहे यांनी केले.

 

याआधीच्या पाच वर्षांत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माजी अर्थमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजप सरकारने लोडशेडींग हा शब्द राज्यातून जवळजवळ हद्दपार केला होता. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत सामान्य जनतेला कधी अव्वाच्या सव्वा बिल पाठविले नाही, शेतकर्‍यांचे विज कनेक्शन कापले नाही. परंतू दुर्दैवाने हे महाभकास आघाडी सत्तेवर आल्यापासून नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने जनतेला छळण्याचे महापाप या सरकारने सुरू केले आहे.
भारनियमनमुक्त असलेल्या महाराष्ट्रावर पुन्हा वीजटंचाई लादणे हे दुर्दैवी आहेच, परंतू यासोबतच सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून जनतेची आर्थिक लूट करण्याचे काम हे कमिशनबाज सरकार करते आहे. हे निंदनीय आहे.

 

पुढे म्हणाले आज राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालूक्यांत हे कंदील आंदोलन पार पडत आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून आमचा सरकारला इशारा आहे, की विजनिर्मीती करणाऱ्या जिल्ह्यालाचं जर हे बेईमानी सरकार अंधारात ढकलत असेल, तर याचे गंभीर परीणाम येणाऱ्या काळात सरकारला मोजावे लागतील. असे मत याठिकाणी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले.

 

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत भद्रावतीमध्ये झालेल्या आंदोलनात, जेष्ठ नेते विजयजी राऊत, चंद्रकांत गुंडावार, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, नरेंद्र जिवतोडे, किशोर गोवारदीपे, विजय वानखेडे, प्रवीण सातपुते, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अमित गुंडावार, प्रविण ठेंगणे, सुनिल नामोजवार, माधव बांगडे, संजय ढाकणे, भाजयुमोचे इम्रान खान, आकाश वानखेडे, प्रा. हेमंत ऊरकुडे, राजेश मोरपाका,सुनील खारकर, पवन हुरकट, निशांत देवगडे, मधुकर सावनकर, अनिल ढेंगळे, हनसन राव, संतोष नागपुरे, गोपाल गोस्वाडे, संजय रॉय, गोविंदा बिंजवे, मोनू पारधे, तोशीब शेख, गजानन कामतवार, अनंता मांढरे, विस्मय बहादे, पांढरे सर, कल्पेश ठक्कर, प्रदीप लोणकर आदिंसह भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत