निलेश लंके प्रतिष्ठान राबविणार टोमॅटो पिक स्पर्धा
निलेश लंके प्रतिष्ठान राबविणार टोमॅटो पिक स्पर्धा
टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार भरघोस बक्षिसे
शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी संकल्पना
सरपंच गाजरे निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने राबवणार उपक्रम
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, पारनेर : तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाने म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे विविध उपक्रम राबवत असतात आता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी निलेश लंके प्रतिष्ठान, संघर्ष ग्रुप व म्हसोबा झाप ग्रामपंचायत यांच्या वतीने पीक स्पर्धेचे आयोजन करून सरपंच प्रकाश गाजरे हे आगळावेगळा शेतकऱ्यांच्या हिताचा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा उपक्रम राबवत आहेत.
निलेश लंके प्रतिष्ठान व संघर्ष ग्रुप तसेच ग्रामपंचायत म्हसोबा झाप यांच्यावतीने टोमॅटो पीक स्पर्धेचे आयोजन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी करण्यात आले आहे. सरपंच गाजरे टोमॅटो पीक स्पर्धा आयोजित करून परिसरातील शेतकऱ्यांना या स्पर्धेत सहभागी करून घेतात व त्या माध्यमातून सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाते.
दरम्यान आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाने याहीवर्षी टोमॅटो पीक स्पर्धा आयोजित केली असून टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या पहिल्या दहा शेतकऱ्यांस ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धेचे काही नियम व अटी ठरवण्यात आल्या असून त्या पुढील प्रमाणे
१) स्पर्धेत भाग घेण्यासाठी १५ मे पर्यंत नोंदणी करणे गरजेचे. २) नोंदणी फी १०० रुपये असेल.
३) प्रथम १० क्रमांकाचे नामनिर्देशन निवड समिती कृषी अधिकारी यांची असेल.
४) म्हसोबाझाप, वारनवाडी, पोखरी मधील शेतकरी सहभागी होऊ शकतात.
५) स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यास सन्मानपत्र दिल जाईल.
दरम्यान या पिक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी अवघी १०० रुपये प्रवेश फी असून या टोमॅटो पीक स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान निलेश लंके प्रतिष्ठान च्या वतीने म्हसोबा झाप चे सरपंच प्रकाश गाजरे यांनी केले आहे.
टोमॅटो पीक स्पर्धा घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे ही आमची भूमिका आहे शेतकऱ्यांचे उत्पादन त्यामुळे वाढण्यास मदत होऊन तालुक्याच्या उत्तर भागातील टोमॅटो उत्पादन जर वाढले तर टोमॅटोवर प्रक्रिया उद्योग आपल्याला निश्चित उभे करता येतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.प्रकाश गाजरे,सरपंच, म्हसोबा झाप ग्रामपंचायत



कोणत्याही टिप्पण्या नाहीत