सोसायटीच्या मतदान केंद्रावर शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका
सोसायटीच्या मतदान केंद्रावर शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका
तिखोल येथील शेतकरी गणपत ठाणगे यांचे निधन
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, पारनेर : तालुक्यातील तिखोल येथील शेतकरी गणपत ठाणगे यांचे रविवारी दि. २४ रोजी ढोकी सेवा सोसायटीच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेले असता हृदयविकाराच्या तीव्रझटक्याने दुःखद निधन झाले ढोकी क्षेत्रामध्ये शेत जमीन असल्याने ढोकी सेवा सोसायटीचे ते सभासद होते त्यासाठी ते मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेले असता ही दुर्दैवी घटना घडली. तिखोल येथील गणपत ठाणगे ही प्रगतिशील शेतकरी होते.
त्यांच्या दुर्दैवी निधनाने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. तिखोल सेवा सोसायटीचे मा. चेअरमन शिवाजीराव ठाणगे यांचे ते बंधू होते. तर उद्योजक अशोक खराबी यांचे ते मामा होते. दशक्रिया विधीचा कार्यक्रम तिखोल येथील दशक्रिया विधी स्थळावर गुरुवार दि. २८ रोजी होत आहे.
त्यांच्या निधनाने तिखोल परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दुर्दैवी निधन झाल्याने ठाणगे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत