Breaking News

महाआरती जागरण आणि शोभायात्रा ही तुमसरसाठी ऐतिहासिक पर्वणी : कल्याणी भुरे

महाआरती--जागरण आणि शोभायात्रा ही तुमसर साठी ऐतिहासिक पर्वणी : कल्याणी भुरे



महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, नरेंद्र मेश्राम,भंडारा : तुमसर येथे रामनवमी निमीत्त पहिल्यांदाच मातोश्री येथील महाआरती जागरण आणि शोभायात्रेच्या  माध्ममातुन सर्वांनी मिळुन एक तुमसर करीता एक संदेश दिला.,आम्ही सर्व एक आहोत आणि एक राहुन सर्व मिळुन एकमेकांना सहकार्य करुया, महाआरती आणि जागरणची सुरुवात नेत्रदीपक अभुतपूर्व अलौकिक सजावटीने कार्यक्रमाची सुरुवात झाली भगवान रामाचे आणि हनुमानजीचे अलौकिक दर्शन घडविले.जनतेनी जागरणात उपस्थित राहुन प्रत्यक्ष स्वरुपातील दर्शन घेतले.

   तसेच नव युवकांनी भगवान राम सितेचे नेत्रदीपक रथयात्रा सजवुन विलक्षण झाकींचे विविध स्वरूपातील शोभायात्रा काढून अभुतपूर्व अलौकिक सजावटीने शोभायात्रेला जनतेनी आपल्या डोळ्यात टिपले. महाआरती आणि जागरण तसेच शोभायात्रा ही तुमसर मधील ऐतिहासिक पर्वणी आहे. तसेच माझ्या मुस्लिम बांधवांनी सुध्दा या रामनवमीला सहकार्य करून हम सब एक हैं हा संदेश दिला. ठिक ठिकानी पाणी नाश्ता शरबत चे आयोजन करून भाविकांचे स्वागत केले.

 या महाआरती आणि शोभायात्रा सुश्री माहेश्वरीजी दिदी यांच्या हस्ते आरती करण्यात आली.मोहाडी विधानसभा आमदार राजुभाऊ कारेमोरे,माजी खासदार मधुकर कुकडे,माजी नगर पालिका अध्यक्ष प्रदीप भाऊ पडोळे साहेब,माजी नगर पालिका अध्यक्ष जगदीशचंद्र कारेमारे साहेब यांच्या शुभहस्ते या महाआरती करण्याचे भाग्य लाभले.
    
या संपु्र्ण कार्यक्रम यशस्वी करण्या करीता विशेष सहयोग महाआरती जागरण समिति तसेच समस्त सदस्य आणि शोभायात्रा करीता सहकार्य श्रीराम नवमी शोभायात्रा समिती सदस्य आदीनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत