Breaking News

नागपुरात अल्पवयीन मुलाकडून २७ वर्षीय युवकाची हत्या

नागपुरात अल्पवयीन मुलाकडून २७ वर्षीय युवकाची हत्या 


महा घडामोडी न्यूज नेटवर्क  नागपूर : नागपुरात घडला एक धक्कादायक प्रकार घडला लग्नात डीजेवर नाचत असताना एका 27 वर्षीय तरुणाचा खून झाला आहे. धक्कादायक म्हणजे खून करणारा आरोपी हा अल्पवयीन आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


लग्नात डीजेच्या तालावर नाचताना आरोपी आणि मृत तरुणामध्ये वाद झाला. या वादातून मृतक तरुणानं आरोपीला मारहाण केली. यानंतर रागात 12 वर्षीय आरोपीला चाकूनं भोसकून खून केला.


ही धक्कादायक घटना गुरुवारच्या रात्रीची आहे. हा खून नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील अण्णाभाऊ साठे नगरमध्ये झाला आहे. राहुल गायकवाड असं मृत तरुणाचे नाव आहे. आरोपी आणि मृत तरुण एकाच परिसरात राहणारे आहेत.


डीजेवर नाचत असताना आरोपी आणि मृत तरुणामध्ये वाद झाला. त्यानंतर मृत राहुलनं आरोपीला मारहाण करण्यास सुरुवात केली. याचाच राग मनात ठेवून आरोपीनं जवळ असलेल्या चाकूनं राहुलच्या छातीवर वार केले.


या घटनेनंतर राहुलला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून त्याची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत