पालकमंत्र्याचे धमकीचा असर
लोकार्पणाविना उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू
पालकमंत्र्याचे धमकीचा असर
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना६) लाखनी शहराच्या मध्यभागातून जातो. ह्या महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने सुसाट वेगाने वाहने धावत होती. त्यामुळे अनेक अपघात होऊन काहींना आपलं जीव गमवावा लागला. तर काहींना कायमचे अपंगत्व आले. त्यामुळे लाखनी व साकोली शहरातून उड्डाण पुलाची मागणी जोर धरू लागली होती. तत्कालीन केंद्रीय राजमार्ग व बंदरे विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांनी जनतेच्या मागणीचा विचार करून लाखनी व साकोली येथे उड्डाण पुल तयार करण्याचे कामास मंजुरी प्रदान केली.
ई-निविदा पद्धतीने उड्डाण पूल बांधकामाचे कंत्राट जेएमसी कंपनीला देण्यात आले होते. मागील अडीच वर्षापासून उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू होते. ते महिनाभरापूर्वीच पूर्णत्वास आले. पण संबंधित विभागास लोकार्पणाचा मुहुर्तच सापडत नव्हता. साकोली येथे कामगारांना पेटी वाटप कार्यक्रमात पालक मंत्री विश्वजित कदम , पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजित वंजारी,नाना गावंडे , राजू पालीवाल , साकोली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होमराज कापगते , जिल्हा परिषद सदस्य मदन रामटेके , शीतल राऊत यांनी ३० एप्रिल पर्यंत उड्डाण पुलाचे लोकार्पण करून वाहतूक सुरू करावी. अशी प्रशासनास धमकी दिली होती. या धमकीचा असर होऊन २९ एप्रिल रोजीच उड्डाण पूल लोकार्पणाविना वाहतुकीस खुला करण्यात आला. त्यामुळे शहरातील जनतेने सुटकेचा निःश्वास सोडला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत