Breaking News

हिन्‍दी अंतिम राज्‍य नाटय स्‍पर्धेत बकुळ धवने ठरली सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्री रौप्‍य पदकाची मानकरी.

 

हिन्‍दी अंतिम राज्‍य नाटय स्‍पर्धेत बकुळ धवने ठरली सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्री रौप्‍य पदकाची मानकरी.


महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : सांस्‍कृतीक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित साठाव्‍या महाराष्‍ट्र राज्‍य हिन्‍दी नाटय स्‍पर्धेच्‍या अंतिम फेरीत सुर्यांश साहित्‍य व सांस्‍कृतीक मंच चंद्रपूर या संस्‍थेने सादर केलेल्‍या ‘रूपक’ या नाटकातील रूपा या मध्‍यवर्ती भूमीकेसाठी बकुळ धवने हिला सर्वोत्‍कृष्ट अभिनेत्री म्‍हणून रौप्‍य पदक जाहीर झाले आहे.

रजनीश जोशी लिखीत व नूतन धवने दिग्‍दर्शीत तसेच इरफान शेख निर्मीत या नाटकाची प्रकाशयोजना हेमंत गुहे यांनी केली असून नेपथ्‍य तेजराज चिकटवार व पंकज नवघरे यांचे आहे. लिलेश बरदाळकर यांचे संगीत असून मेघना शिंगरू व बबीता उईके यांनी रंगभूषा व वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे. या नाटकात विशाल ढोक, रोहिणी उईके व बकुळ धवने यांच्‍या प्रमुख भुमीका आहेत. बकुळ धवने हिच्‍या या उल्‍लेखनीय यशाबद्दल येथील सांस्‍कृतीक वर्तुळात तिचे अभिनंदन व कौतुक करण्‍यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत