Breaking News

मुलांनी मैदानी खेळ खेळणे आवश्‍यक : सौ. उज्वला प्रमाेद नलगे

 

मुलांनी मैदानी खेळ खेळणे आवश्‍यक : सौ. उज्वला प्रमाेद नलगे

महा घडामोडी न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : धावतं युग आलं आणि मैदानं ओस पडतांना दिसू लागली. युवा पिढी हातात मोबाईल घेऊन तास्ंतास घरात एकाच ठिकाणी बसून असतात. याचे दुष्परीणाम सुध्दा लगेच दिसायला लागले आहेत. व्यायामाच्या अभावामुळे दुष्परीणाम सुध्दा दिसायला लागले. या दुष्परीणामांपासुन युवा पिढीला दुर ठेवायचे असेल तर त्यांना कबड्डी सारखे मैदानी खेळ खेळणे आवश्‍यक असल्‍याचे प्रतिपादन शिवसेना महिला आघाडीच्‍या जिल्हा संघटिका सौ. उज्वला प्रमाेद नलगे यांनी केले.

मॅजिक बसतर्फे लहान मुलींचे कबड्डी सामने खुटाळा गावात घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून त्‍या बोलत होत्‍या. चंद्रपूर शिवसेना महिला आघाडीच्‍या जिल्हा संघटिका सौ. उज्वला प्रमाेद नलगे यांच्या मार्गदर्शनात कबड्डी सामने पार पडले. हे कबड्डी सामने अंडर - १४ (वर्ग ५ ते ७ वी) व अंडर - १७ (वर्ग ८ ते ९ वी) अशा २ गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विविध शाळेच्या विद्यार्थिनी असलेल्‍या एकूण १२ टिम सहभागी झाल्‍या होत्‍या. अनेक रोमांचकारी सामने पाहायला मिळाले.  

यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका सौ. उज्वला प्र. नलगे, मॅजिक बसचे प्रशांत लोखंडे सर, अरुण सर, आदर्श चिवंडे, कोमल पचारे, नीलम वर्मा, जिल्हा परिषद शाळा खुटाळाचे मुख्याध्यापक सर, नागाळा ग्रां.पं. उपसरपंच सज्जन सातपुते, युवा सेना तालुका समन्वयक विपिन कोंगरे, शिवसैनिक सद्दाम कनोजे, युवासेना उपतालुका ज्ञानेश्वर लोनगाडगे, सुश्मित गौरकार, रोहन नलगे, चेतन कांमळी, आकाश पावडे, शुभम घागरगुंडे, भास्कर ठावरी समस्त शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कबड्डी सामन्‍याची संपूर्ण व्‍यवस्‍था जिल्हा संघटिका सौ. उज्वला प्रमाेद नलगे यांनी केली होती. कार्यक्रमाला गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत