चुकीच्या दरानं बियाणे, खतांची विक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार : दादाजी भुसे
चुकीच्या दरानं बियाणे, खतांची विक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार : दादाजी भुसे
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम भंडारा : राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना जरा आखडता हात घेत आहेत. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात मी सांगितले आहे की, शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध झाले पाहिजे. वेळेवर पीक कर्ज दिले तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार असल्याचे मत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले. ज्या बँका आखडता हात घेत आहे, त्यांची भुमिक चुकीची असल्याचे दादाजी भुसे म्हणाले. बियाणे, रासायनिक खतांच्या संदर्भात काही तक्रारी येत आहेत. त्याची मी दखल घेतली आहे. चुकीच्या दराने विक्री होत असेल्यास फौजदारी कारवाई होणार असल्याचे भुसे यावेळी म्हणाले.
तरुण शेतकऱ्यांच्या सुचनांचे स्वागत
तरुण शेतकऱ्यांचे सुचनांचे आम्ही स्वागत करु असेही भुसे म्हणाले. कोरोनाकाळ वाईट होता. कोरोनाने काही चांगल्या गोष्टी शिकवल्या. लहान गावामध्येही शेतकरी पिकवलेला माल ग्राहकांना विकत होता. काही मुलांनी अॅप तयार केले. ऑनलाईन माध्यमातून शेतमाल ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. लहान लहान प्रयोग केले, ते यशस्वी झाले असेही भुसे यावेळी म्हणाले. रासायनिक खतांच्या तक्रारी येत आहेत. त्याची मी दखल घेतले आहेत. आज त्याचे रिझल्ट दिसतील. ज्यादाच्या भावाने, चुकीच्या दराने विक्री होत असेल तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत. तसे आदेश दिले असल्याचे भुसे म्हणाले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत