Breaking News

केंद्रीय अर्थ राज्‍यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा ३० मे रोजी चंद्रपूर दौरा.

 

केंद्रीय अर्थ राज्‍यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा ३० मे रोजी चंद्रपूर दौरा.

भाजपाचा सेवा, सुशासन व गरीब कल्‍याण पर्वाचा शुभारंभ होणार.

महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : केंद्रीय अर्थ राज्‍यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे ज्‍येष्‍ठ नेते डॉ. भागवत कराड हे दिनांक ३० मे २०२२ रोजी  चंद्रपूर दौ-यावर येत आहेत. डॉ. भागवत कराड यांचे सकाळी ९.०० वा. भाजपातर्फे पडोली चौकात भव्‍य स्‍वागत करण्‍यात येणार आहे. ९.३० वा. हॉटेल एन.डी. येथे आगमन, १० ते ११.३० वा. चंद्रपूर जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या २० कलमी सभागृहात मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचेद्वारा आयोजित कार्यक्रमाला आभासी पध्‍दतीने उपस्थिती, 

सकाळी ११.३० ते  १ वा. केंद्र सरकारच्‍या विविध योजनांबाबत विविध बॅंकेच्‍या अधिका-यांसमवेत नियोजन भवन जिल्‍हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे आढावा बैठक,दुपारी  १ ते २  राखीव दुपारी २.०० वा. डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर येथे भाजपाच्‍या सेवा, सुशासन व गरीब कल्‍याण पर्वाच्‍या शुभारंभाला उपस्थिती अशा विविध कार्यक्रमांना ना. भागवत कराड उपस्थित राहणार आहेत.

जिल्‍हयातील भाजपा पदाधिका-यांनी ना. भागवत कराड यांच्‍या स्‍वागतासाठी मोठया प्रमाणावर उपस्थित राहण्‍याचे आवाहन भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजुयमो जिल्‍हाध्‍यक्ष आशिष देवतळे, भाजयुमो महानगर जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर, भाजपा महिला आघाडीच्‍या जिल्‍हाध्‍यक्षा अलका आत्राम, महानगर जिल्‍हाध्‍यक्षा सौ. अंजली घोटेकर, सौ. राखी कंचर्लावार, राहूल पावडे आदींनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत