सरस्वती विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांचे मध्यान्न भोजनाचे धान्य विना तराजू काट्याने बिनदास्त वाटप
सरस्वती विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांचे मध्यान्न भोजनाचे धान्य विना तराजू काट्याने बिनदास्त वाटप
विद्यार्थी मित्रांच्या तोंडच्या घासाची हेरा फेरी
रावेर पंचायत समिती बी एल ओ आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या चौकशी ची मागणी
शासकीय यंत्रणांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी दिपक तायडे,रावेर : सरस्वती विद्यामंदिर या शाळेत मुख्याध्यापक आद जैन सर यांची शाळेत जाऊन भेट घेतली असता विद्यार्थी मित्रांच्या मद्द्यांन भोजन नाची विचारपूस केली असता सरांचे उडवा उडवीची उत्तरे लक्ष्यात घेता अन्न धान्य च्या खोलीत शिरले असता तिथे कोणत्याही प्रकारचा तराजू काटा दिसून आला नाही. सदरचे धान्य हे शाळेतील शिक्षक व शिपाई व इतर दोन स्त्रिया वाटत होते ,परंतु सदरचे धान्य हे कोणत्याही प्रकारचा तराजू काटा नसतांना राजरोस पणे वाटले जात होते,
तशी शाळा गावापासून दूर अंतरावर असून शासनाचा कोणताही जबाबदार अधिकारी इकडे चुकूनही फिरकत नाही त्यामुळे ह्या शाळेतील मुख्याध्यापक व इतर हे मिळून बिनधास्त हेरा फेरी करतात आणि एक प्लास्टिक ची बाटलीचे कापलेले डबकं सारखं माप येथे असून एक डबा आहे ,प्रश्न असा आहे की असे अंदाज पंचमे धान्य वाटप का केले जाते मोजून का दिले जात नाही असं काही पालकांचं म्हणणे आहे,
तरी विध्यार्थी मित्रांचे धान्य कमी तर दिले जात नाही अशी शंका पालकांना आहे.शासनाने अन्न धान्य वाटप काय विना तराजू काट्याने सांगितले आहे का आणि असं कुठं पर्यंत चालेल असा प्रश्न सुज्ञ पालकांना सह नागरिकांना पडला आहे तरी या सरस्वती विद्या मंदिर शाळे कडे लक्ष blo देतील काय ,का यांचेच काही साठे लोटे या अफरताफरीमध्ये आहे ,या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी करणे आवश्यक आहे असं विद्यार्थी मित्रांच्या शुभ चिंतकाना वाटत आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत