जिल्हा परिषदेत कोंबड्यांवरून सत्ताधारी-विरोधकांत 'झुंज'!
जिल्हा परिषदेत कोंबड्यांवरून सत्ताधारी-विरोधकांत 'झुंज'!
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,नागपूर : शेळीवाटप योजनेत गैरप्रकार झाल्याचा मुद्दा गाजत असतानाच जिल्हा परिषेदत आता तलंग (कोंबडी) वाटप योजनाही त्याच धर्तीवर राबवून सत्ताधाऱ्यांचा कोंबड्या पळविण्याचा प्रयत्न असल्याने सत्ताधारी व विरोधकांत चांगलीच जुंपली आहे.
गोरगरीब लोकांच्या कोंबड्या पळविण्याचा हा प्रकार आहे. गरजूंना या योजनेचा लाभ न देता पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील गावातील श्रीमंत लोकांना लाभ देण्यासाठी ऑफलाईनचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अनुदानावर शेळी, कोंबड्या वाटप योजना राबविली जाते. यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. यात पदाधिकाऱ्यांना फारसा हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे तलंग वाटप प्रक्रिया ऑफलाईन राबविण्यात यावी, अशा अशयाचा प्रस्ताव अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर केला.
विरोधकांनी यावर आक्षेप घेत ऑनलाईन प्रक्रियाच कायम ठेवण्याची मागणी केली. गतवर्षी ऑफलाईन पद्धतीने या योजनेची अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये गरजूऐवजी सधन लाभार्थ्यांना या गटाचे वाटप करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते आतीश उमरे यांनी केला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत