ब्रम्हपुरीच्या बँक ऑफ बडोदाच्या एटीएमला आग
ब्रम्हपुरीच्या बँक ऑफ बडोदाच्या एटीएमला आग
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी संतोष मडावी,चंद्रपूर : शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. अश्यातच आगीचे तांडव सुरू झाल्यास संपूर्ण हाहाकार माजू लागल्याचा प्रकार शनिवारच्या पहाटेला घडला आहे. देलनवाडी स्थित बँक ऑफ बडोद्या बँकेला लागून असलेल्या एटीएम रूमला आग लागल्याने काही काळासाठी तारांबळ उडाली होती.
ब्रम्हपुरी शहरात जवळपास सर्वच बँक व एटीएम मशीन आहेत. बँक ऑफ बडोधाची एटीएम मशीन बँकेला लागून आहे. शनिवारी पहाटे काही नागरिक फिरावयास जात असताना एटीएम रुममधून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले असता व बँक मॅनेजरला मुख्य कार्यालयाकडून मॅसेज आला असता नागरिक व बँकेचे कर्मचारी यांनी धाव घेतली परन्तु आग आटोक्यात येत नसल्याने समोर उराडे पेट्रोल पंप वरून पाण्याचा पाईप धर्मा भरडकर यांनी लांबवुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला,
लगेच नगरपरिषदची अग्निशमन गाडी आल्याने आग आटोक्यात आली.या आगीत एटीएम जळून खाक झाले असून आगीचे धूर आजूबाजूला पसरल्याने कोंदट वातावरण निर्माण झाले होते. आग लवकर आटोक्यात आल्याने इतरत्र हाणि टळली. बँक कर्मचारी अमोल राऊत व त्यांचे सहकारी यांनी आग विझविण्यात बरीच मदत केली.यावेळी पोलीस निरीक्षक रोशनकुमार यादव आपल्या ताफ्यासह उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत