Breaking News

पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

 पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड


महा घडामोडी न्युज प्रतिनिधी वर्धा : पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड पोलीस स्टेशन वर्धा शहर व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कार्यवाही एकूण ८,४५,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त.


फिर्यादी श्री अशोक राजेश्वर मरडवार, वय ७८ वर्षे, रा. सिंदी मेघे, वर्धा हे दिनांक ०९-०५-२०२२ रोजी सकाळी ११.०० वा ते ११.३० वाजता दरम्यान राममंदीर गोल बाजार वर्धा येथे ज्युपीटर मोपेड गाडीने जात असतांना पाषाण चौक, वर्धा या ठिकाणी दोन अनोळखी इसम मो टारसायकलने आले व फिर्यादी यांना थांबवून पोलीस असल्याची बतावणी करुन सध्या वातावरन बेकार आहे.

 असे म्हणुन फिर्यादीस अंगावरील सोन्याचा गोफ वजन २७ ग्रॅम कि. ४५,०००/- रुपये तसेच सोन्याची अंगठी 2 नग वजन १२ ग्रॅम कि. ३०,०००/- रुपये असा एकुण ७५,०००/- रुपयाचा मुद्देमाला गाडीचे हुकाला लटकवुन असलेल्या पिशवीत ठेवण्यास सांगीतला व फिर्यादीस बोलण्यात व्यस्त करुन पिशवीतील मुद्देमाल काढुन घेवुन फिर्यादीची फसवणुक केल्याने फिर्यादी यांना दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे अपराध क्र. ६८२/२०२२ कलम ४२०, १७०, १७२, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेता गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने पोलीस स्टेशन वर्धा शहर आणि स्थानिक गुन्हे शाखा वर्धा असे पोलीस अधिकारी व अंमलदार प्राप्त माहितीच्या आधारे अहमदनगर व औरंगाबाद जिल्हयात जावुन गुन्हयातील आरोपी नामे १) अली रजा उर्फ अली बाबा शब्बीर बेग ईराणी, वय ४७ वर्ष, रा. वार्ड नंबर १ बोरावणी कॉलेज रोड, ईराणी गल्ली, श्रीरामपुर जि. अहमदनगर, २) शेख शाहरुख रईस, वय २८ वर्षे, रा. नायकवाडी मोहल्ला, शेवगाव जि. अहमदनगर, ३) रियाज रशीद शेख, वय ३५ वर्ष, रा. विहा मांडवा ता. पैठण जि. औरंगाबाद आणि ४) अविनाश लक्ष्मण गायकवाड वय २९ वर्षे, रा. रामनगर, लांडे वस्ती रोड, शेवगांव जि. अहमदनगर यांचा शोध घेवून अटक करण्यात आली आहे.

वर नमूद आरोपींकडुन गुन्हयातील सोन्याचा गोफ वजन २७ ग्रॅम कि. ४५,०००/- रुपये आणि सोन्याची अंगठी 2 नग वजन १२ ग्रॅम कि. ३०,०००/- रुपये असा मुद्देमाल तसेच स्विप्ट डिझायर कार क्र. एमएच -२०/ ईवाय-७६४२ सिल्वर गोल्डन रंगाची कि. ६,००,०००/- रुपये हिरो कंपनीची एक्स पल्सर मोटारसायकल क्र. एमएच-१६/सीएक्स-३७४९ किमत १,२०,०००/- रुपये आणि ४ नग अँड्राईड मोबाईल कि. ५०,०००/- असा एकुण ८,४५,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून सदर गुन्हा उघडकीस आणला.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. प्र शांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. य शवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी, वर्धा श्री. पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. सत्यवीर बंडीवार, पो.स्टे वर्धा शहर, मा. पोलीस निरीक्षक श्री. संजय गायकवाड, स्था. गु.शा. वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि. सलाम कुरेशी, पोलीस अंमलदार सचिन इंगोले, दिपक जंगले, अविनाश निंबाळकर सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि अमोल लगड, पोलीस अंमलदार हमीद शेख, चंदु बुरंगे, श्रीकांत खडसे, दिनेश बोथकर, मनिष कांबळे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत