कोरपणा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीची पल्सर NS 160 मोटारसायकल हस्तगत!
चोरीच्या दुचाकीचा परसोडा फाटा येथे शोध; दोन आरोपींकडून मोटारसायकल जप्त
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : पोलीस स्टेशन कोरपणा हद्दीत दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात कोरपणा पोलिसांनी कारवाई करत चोरीस गेलेली पल्सर NS 160 मोटारसायकल हस्तगत केली आहे. MH-34-BJ-4733 क्रमांकाची ही मोटारसायकल दिनांक 30 ऑक्टोबर 2026 रोजी परसोडा फाटा येथून पोलीस पथकाने शोधून काढत ताब्यात घेतली. या प्रकरणात महेश सुरेश पोतुकलवार आणि आशिष उर्फ ऋतिक जानकीराम चौधरी यांच्याकडून सदर मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.
पोलीस स्टेशन कोरपणा येथे दाखल असलेल्या अप. क्र. 344/2026 मधील चोरीच्या घटनेचा तपास करताना पोलिसांनी ही कारवाई केली. चोरीस गेलेल्या दुचाकीचा शोध घेऊन ती हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
ही कारवाई चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक विनोद रहांगडाले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश वाकुलकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र राजूरकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
चोरीच्या वाहनांचा शोध घेऊन ती हस्तगत करण्यासाठी पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या अशा कारवायांमुळे वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यास मदत होऊ शकते. या प्रकरणाचा पुढील तपास कोरपणा पोलीस करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत