कौशल्य प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी स्वतः निर्माण करा
कौशल्य प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी स्वतः निर्माण करा
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर ; कौशल्य प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी स्वतः निर्माण करा, असे आवाहन चंद्रपुरातील मोटिवेशनल ट्रेनर अविनाश लेंनगुरे यांनी केले. रक्षण धरणी मातेचे संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमात ते बोलत होते. वर्धापन दिनाचे औचित्य साधून मोकासा तिरवंजा येथे युवा रोजगार मार्गदर्शन कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोकासा तिरवंजाच्या सरपंच अर्चना साव,रक्षण धरणीमातेचे संस्थेचे अध्यक्ष राहुल कोटकर, श्रेयश शेंडे, रश्मी कोटकर व रिदम कोटकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
वंदनीय राष्ट्रीय तुकडोजी महाराज सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला परिसरातील अनेक विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि रोजगार अशा मुद्द्यांना घेऊन यावेळी प्रबोधन करण्यात आले. रक्षण धरणी मातेचे ही संस्था गेल्या तीन वर्षापासून पर्यावरण, स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्ती या क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राहुल कोटकर यांनी संमेलन व आभार प्रदर्शनातून दिली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत