अज्ञात इसमाने जाळला धानाचा पुजना
अज्ञात इसमाने जाळला धानाचा पुजना
शेतकरी विलास मेश्राम यांचे लाख रूपयांची नुकसान
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी संतोष रोकडे, अर्जुनी-मोर : अर्जुनी-मोर तालुक्यातील जाणवा येथील शेतकरी विलास मेश्राम यांचा तिन एकराचा धान पिकाचा पुजना अज्ञात इसमाने पेटवला त्या विलास मेश्राम यांचे जवळपास सव्वा लाख रूपयांचे आर्थिक नुकसान झाले सकाळी शेतकरी आपल्या शेतात पाहणी करण्याकरता गेला असता ही घटना लक्षात आली घटनेची माहिती तलाठी यांना देण्यात येऊन तलाठी यांना देण्यात आली सुट्टी असल्याने तलाठी यांनी कोतवालांना घटनास्थळी पाठविले आता शेतकरी विलास मेश्राम त्यांच्यावर अचानक संकट कोसळल्याने त्यांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत