सिन्देवाही येथिल स्मशानभूमी जवळील पुलावर ट्रक आणि ट्रेलरची समोरा समोर धडक
सिन्देवाही येथिल स्मशानभूमी जवळील पुलावर ट्रक आणि ट्रेलरची समोरा समोर धडक
अपघातामुळे सुमारे 3.30 तास रस्ता वाहतुक बंद
अपघातात चालक गंभिर जखमी
रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगाच रांगा
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी संतोष मडावी चंद्रपूर : मुल कडुन सिन्देवाही मार्गे सुरजागड पहाडी वरून लाल रंगाची चुरी गिट्टी भरून येथ असलेल्या ट्रक क्र MH 34 AB 7988 व सिन्देवाही मार्गे जात असलेला ट्रेलर क्र.MH 34 AB 2551 चालकांचे नियंत्रण सुटल्याने ट्रक व ट्रेलरचा समोर धडक होऊण मोठा अपघात झाला.
हा अपघात सकाळी 6.30 च्या दरम्यान सिन्देवाही येथिल स्मशान भूमी जवळ असलेल्या नाल्याच्या पुलावर झाला. अपघातात ट्रेलरने पुलाचे संरक्षंन भित तोडून 2 चाके खाली गेली होती.अपघाताची माहीती मिळताच सिन्देवाही पोलिस घटनास्थळावर लागलीच दाखल होऊन परिस्थिति नियंत्रनात आनली या अपघातात ट्रक,ट्रेलर चालंकाना गंभिर दूखापत झाली असून उपचाराकरीता हॉस्पीटलला दाखल करण्यात आले.
ट्रक व ट्रेलरचा मोठ्या प्रमानात नुकसान झाले.अपघातामुळे रस्ता बंद झाल्याने दोन्हि बाजूला वाहानाची रांगच रांग लागली होती. अपघात ग्रस्त ट्रक व ट्रेलर बाजूला करण्या करीता दोण हायड्रा मशिन व एक जे.सि.बी मशिनच्या सहाय्याने 3.30 तासाच्या अथक परीश्रमाने ट्रक व ट्रेलर बाजूला करूण रस्ता रहदारीस सुरू करण्यात आला.
सुमारे 3.30 तास रहदारीत अडकल्याने व उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेकांच्या घशाला कोरड पडली होती सदर बाब पत्रकार व सामाजीक कार्यकर्ता अम्रूत दंडवते यांचे लक्षात येताच त्यांनी थंड गार पाण्याची व्यवस्था करीत प्रवाशांची तहान भागवली. या वेळेस सिन्देवाही पोलीस,पत्रकार,समाजसेवकांनि अथक परीश्रम घेतले.पुढील तपास ठानेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनाथ सिंदेवाही पोलीस करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत