Breaking News

अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांच्या महसूल व पोलीस प्रशासनाने आवळल्या मुसक्या

 अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांच्या महसूल व पोलीस प्रशासनाने आवळल्या मुसक्या 

महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,सुरज शहाणे, परभणी ; प्रशासनाची परवानगी न घेता वाळू उतखंनंन होत असल्याने महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत मंगळवारी 24में रोजी या वाळू धक्यावर वाळूउपसा करण्यासाठी वापरले जाणारे पोकल्याण मशीन बोट जप्त केल्या.

जिंतूर तालुक्यातील सावळी भागात विनपरवाना वाळू उतखंनंन सुरु असल्याची माहिती नायब तहसीलदार ओमप्रकाश गोंड व तलाठी राठोड यांना समजली.त्यांनी हि माहिती वरिष्ठनां दिली त्यानंतर उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार तहसीलदार माडवगडे मंडळ अधिकारी प्रशांत राखे यांच्यासह पोलीस निरीक्षक दीपक दत्तूलवार यांनी घटनास्तळंवर जाऊन पोकलेन मशीन व बोट जप्त केली. 

विशेष म्हणजे महसूल प्रशासनाची कार्यवाही होणार याची कुणकुण लागताच वाळूमाफियानी आधीच वाळूने भरलेले टिपऱ रस्त्यावर रिकामे करून त्या ठिकाणाहून पोबारा केला.एक टिपऱ नदीपात्रात उभे होते. या भागात मागील अनेक दिवसापासून अवेध वाळू उपसा होत होता.विशेष म्हणजे या धक्याची मुदत मागील आठवाड्यात संपली आहे.

मुदत संपलेली असतानाही वाळू उपसा होत असेलेली माहिती महसूल प्रशासनाला मिळाल्याने हि कारवाई केल्याचे समजते जप्त केलेली बोट व पोकलेन मशीन नदी पात्राबाहेर काढण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत