…तर वरिष्ठ सनदी अधिकारी यांनी पदांचा व अधिकारांचा मनमानी गैरवापर करू नये!!
निलंबीत श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी व्यकत केली आपली व्यथा/तक्रार !!
…तर वरिष्ठ सनदी अधिकारी यांनी पदांचा व अधिकारांचा मनमानी गैरवापर करू नये!!

महा घडामोडी न्यूज नेटवर्क,मुंबई : पोलीस दलातील काही ठराविक सनदी अधिकारी व इतर पदांवरील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्या वैयक्तिक फायद्याकरता चालविलेला मनमानी कारभार आणि त्याच अनुषंगाने केलेला भ्रष्टाचार त्याच संदर्भातील प्राप्त झालेल्या तक्रारी या संदर्भात पोलीस दलातील ठराविक सनदी अधिकारी किंवा त्यांनी नेमणूक केलेले चौकशी अधिकारी, प्राधिकरण, शासन अशा भ्रष्ट कारभारात लिप्त असलेल्या पोलीस दलातील लोकसेवकांच्याबाबत किंवा त्यांच्या विरोधात आलेल्या तक्रारीबाबत सतत उदासीन असतात हे सत्य कोणी नाकारू शकत नाही.
आपल्याच खात्यातील भ्रष्टाचार करणारे लोकसेवक यांच्यावर योग्य कारवाई, अंकुश ठेवता येत नसेल, तर अशा वरिष्ठ पदावर बसण्यासाठी ते किती पात्र आहेत हे मोजमाप करण्याची गरज निर्माण झाली आहे, केवळ मानाचे पद मिळावे म्हणून राज्यातील, केंद्रातील राजकारणी राजकीय पक्षाचे नेते, मा. मंत्री महोदय यांच्या शिफारशी, राजकीय वरदहस्त येनकेन मार्गाने मिळवून पद मिळवल्यानंतर मात्र प्राप्त झालेल्या उच्चपदाच्या आसनावर बसल्यानंतर आम्ही कोणते योग्य काम करतो, जे काम मला कायद्याच्या चौकटीत राहून करावयाचे आहे आणि ते करणे मला बंधनकारक आहे.
याची जाणीव असतानासुद्धा केवळ आणि केवळ ज्याच्या राजकीय वरदहस्तामुळे मला हे मानाचे पद मिळाले त्यांच्या राजकीय आश्रयाला बळी पडून वाटेल तसे बेबंदशाही फतवे, अतिरंजित कारवाईचा बडगा उगारून पोलीस दलातील भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांना प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करून, गटबाजीचे राजकारण करून अशा पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा काटा कायमचा कसा काढायचा याचे सतत कटकारस्थान करत राहून भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात आणायचे, त्याचे व त्याच्या कुटुंबियांचे जिणे मुश्किल करून टाकायचे! तो कसा आत्महत्येस प्रवृत्त होईल इतकी अमानवी कृत्य, मानसिकता खराब होईल इतक्या खालच्या पातळीत त्यांना त्रास देण्याची कोणतीही संधी सोडायची नाही, इतकी पातळयंत्री यंत्रणा तयार करून आपल्या भूमिका पार पाडत राहतो, हेच कार्य करत राहणे हीच यांची सदविवेकबुद्धी.
पोलीस दलातील अनेक समस्यांपैकी सर्वात भयंकर समस्या आहे, ती पोलीस दलातील काही ठराविक सनदी पोलीस अधिकारी, काही ठराविक इतर पदांवरील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने चालणारी भ्रष्ट यंत्रणा (भ्रष्टाचार समस्या) आणि दुसरी अत्यंत भीषण गंभीर समस्या पोलीस दलातील सनदी अधिकारी, इतर विविध पदांवरील पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या आत्महत्या या गंभीर समस्येवर उपाय योजना करण्यास आज शासनापासून पोलीस दलातील आजी-माजी कुटुंबप्रमुख यांनी कोणतीही योग्य ठोस उपाययोजना आखली नाही!
मात्र हे सर्व बेकायदेशीर कार्य कायद्याने चुकीचे आहे, मी वरीष्ठ पदावर असून पोलीस दलाचा कुटुंब प्रमुख या नात्याने मला वरीष्ठ ते कनिष्ठ या सर्वांना योग्य न्याय देण्याचे काम करणे गरजेचे असूनसुद्धा मी फक्त भ्रष्टाचारपूरक कामं करणारे ठराविक सनदी अधिकारी, इतर ठराविक पोलीस अधिकारी, कर्मचारी, स्वमर्जीतील/राजकीय वरदहस्त असणाऱ्यांना वेगळे न्याय जे कायद्याने बेकायदेशीर आहेत, हे माहीत असूनसुद्धा सतत करत असतो. चौकशी अधिकारी यंत्रणा यांच्या मनमानी खोट्या रंगविलेल्या कागदपत्रे यांच्यावर दृढ विश्वास ठेऊन चुकीच्या कार्यपद्धतीने न्याय दानाचे काम करण्यात धन्यता मानत, आपल्याच कार्यकाळात दलातील भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराला मूक संमतीने असंवेदनशील होऊन या सर्वांना जोमाने भ्रष्टाचार कारभार करण्याचे अलिखित अप्रत्यक्षपणाने लेखी आदेश देण्याचे अवैध काम करत असतो.
पोलीस दलातील अनेक समस्यांपैकी सर्वात भयंकर समस्या आहे, ती पोलीस दलातील काही ठराविक सनदी पोलीस अधिकारी, काही ठराविक इतर पदांवरील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने चालणारी भ्रष्ट यंत्रणा(भ्रष्टाचार समस्या) आणि दुसरी अत्यंत भीषण गंभीर समस्या पोलीस दलातील सनदी अधिकारी, इतर विविध पदांवरील पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या आत्महत्या या गंभीर समस्येवर उपाय योजना करण्यास आज शासनापासून पोलीस दलातील आजी-माजी कुटुंबप्रमुख यांनी कोणतीही योग्य ठोस उपाययोजना आखली नाही! उदाहरणार्थ, शेतकरी राज्याच्या जीवावर भूमिहीन मजूर व त्यांचे कुटूंबीय अवलंबून असतात, त्यामुळे सदर मजुरांची क्षमता तर रोजची डाळ-भात, भाजी-भाकरी विकत घेऊन खाण्याइतपतसुद्धा नसते! या क्रय क्षमतेचा सरळ संबंधसुद्धा भ्रष्टाचार कारभाराशी आहे, कारण एक टक्का लोकांची वाढलेली संपत्ती आणि त्यात वाटा मिळवण्यासाठी या समाजातील नोकरशाही लोकसेवक ते राजकीय नेत्यांपर्यंत भ्रष्टाचार करण्यात चढाओढ लागलेली आहे. याचं वास्तव म्हणजे भ्रष्टाचार वाढीस लागला आहे, हे सत्य नजरेआड करून चालणार नाही.
दुःखदायी वेदनादायी गोष्ट हीच आहे, की “भ्रष्टाचार देशाच्या संपत्तीच्या त्या विभागणीमध्ये केला जातो, ज्यामध्ये सामान्यातील सामान्य, गरिबांतील गरीब माणसांची त्यात बरोबरीची हिस्सेदारी असते, आम्हाला आणि आमच्या शासनास, शासनातील शासकीय लोकसेवक मग ते कोणत्याही पदावरील असोत, मग ते मा. मुख्यमंत्री असोत किंवा भारताचे मा. पंतप्रधान असोत, सनदी अधिकारी ते अगदी कनिष्ठ पदांवरील सर्वच शासकीय विभागातील कार्यालये, येथील शासकीय लोकसेवक यांना एक प्रामाणिक प्रयत्न, विचार करायचा आहे की या गरीब माणसांच्या खरेदी करण्याच्या क्षमता कशा वाढतील ज्यांची ७० ते ७५% रक्कम फक्त १% लोकांच्या खिशात बेमालूमपणे जाते. आमच्या व्यवस्था निवडणुकीपूर्वी खूप घोषणा करतात हे ही सर्वश्रुत आहेच.
मान्यवर सर्व बंधू-भगिनी वरील माझे विचार मला पोलीस दलातील भ्रष्टाचार उघड करताना आलेले असून त्याचा विपरीत परिणाम माझ्या संपूर्ण कुटूंबाला व मला भोगावा लागत आहे. यात कोणाची व्यक्तिशः किंवा व्यक्तीविषयी किंवा कोणत्याही पदावरील शासकीय सेवेतील अति वरिष्ठ अधिकारी, विभाग, शासन मा. मंत्री महोदय यांची बदनामी करण्यासाठी केले नाहीत, ही सर्व वस्तुस्थिती मी आजही अनुभवत आहे, सद्या मी निलंबित आहे याच कारणास्तव 20 जानेवारी 2022 पासून भ्रष्टाचार उघड करतो व पोलीस दलाची बदनामी करतो हे कारण देऊन !! : - सुनील भगवंतराव टोके (सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुख्य नियंत्रण कक्ष, मा पोलीस आयुक्त मुंबई पोलीस दल)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत