नेपाळच्या विमान अपघातात 22 जणांचा मृत्यू महाराष्ट्रातील चौघांचा समावेश
नेपाळच्या विमान अपघातात 22 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रातील चौघांचा समावेश
या विमानात चार भारतीय आणि तीन जपानी नागरिकांसह 22 प्रवासी होते भारतीयांमध्ये ठाण्याचा चौघांचा समावेश आहे या विमानाने पोखरा ते जोमसोमसाठी सकाळी 09:55 वाजता उडान घेतले होते, उडान घेतल्याच्या पंधरा मिनिटानंतर विमानाचा संपर्क तुटला त्यानंतर अपघात झाल्याची माहिती समोर आली, स्थानिक लोकांनी नेपाळ लष्कराला दिलेल्या माहितीनुसार विमान मानपती हिमालय भूस्खलनात लामचे नदीच्या मुखाशी कोसळले आहेत.
लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, नेपाळ लष्कर जमीन आणि हवाई मार्गाने घटनास्थळाकडे जात आहे, रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सैन्य दलासह स्थानिक लोकही मदत करताहेत, अपघात इतका भीषण होता की मृतदेहांची ओळख पटवूनही कठीण झाला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत