Breaking News

बनावट खत विक्रीचा गोरखधंदा उघड

 

बनावट खत विक्रीचा गोरखधंदा उघड

किनवट तालुक्यात ट्रकसह ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल "

बनावट खताचा प्रकार निदर्शनास आल्यास तालुका कृषी अधिकारी तथा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांकडे तक्रार करावी

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, माहुर : नागपूर येथील एनपीजे अॅग्रोटेक सेंद्रिय खताच्या नावाखाली बनावट खत विक्रीचा गोरखधंदा खंबाळा (ता. किनवट, जि.नांदेड) येथे उघड झाला आहे. किनवट तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांच्या फिर्यादीवरून आठ लाख १८ हजार रुपयांचे ५८५ बनावट खत,२५ लाखांचा ट्रक असा ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मांडवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तोंडावर बनावट खत,बियाणे विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहून फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी.


 बनावट खताचा प्रकार निदर्शनास आल्यास तालुका कृषी अधिकारी तथा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांकडे तक्रार करावी.- बालाजी मुंडे, तालुका कृषी अधिकारी, किनवट.

 किनवट तालुका गुणवत्ता नियंत्रण पथकाने खंबाळा (ता.किनवट) येथे पकडलेला बनावट खत असलेला ट्रक. यांच्याकडून एनजेपी अॅग्रोटेककडे खत विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बनावट खते, बियाण्याची विक्री होऊ नये, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी भरारी पथकाची स्थापना केली आहे. खंबाळा येथे बनावट खत विक्री होत असल्याची माहितीया पथकाला मंगळवारी (ता. १७) मिळाली होती. 

किनवट तालुका कृषी अधिकारी तथा तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक बालाजी मुंडे, मंडळ कृषी अधिकारी बी. आर. मुनेश्वर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस. एम. मुंडे, कृषी पर्यवेक्षक एस. पी.जाधव यांच्या पथकाने खंबाळा येथे भेट दिली असता तेथे ट्रकमध्ये पिवळ्या रंगाची पोती आढळली. 

याबाबत विनायक खोब्रागडे (रा. साकरा खुर्द, ता. घाटंजी, जि. यवतमाळ) या व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने एनजेपी कंपनीचे (गुलमोहरनगर, भारतवाडा रोड, नागपूर) सेंद्रिय खत नागपूर येथील पुष्कर बरबटे व निशांत बरबटे यांचे असल्याचे सांगितले.खताच्या पोत्यावर एका बाजूला ॲग्रोमॅक्स गोल्ड (ग्रॅन्यलेटेड आणि शॉयल कंटीनेटर), खालच्या बाजूला 'मॅन्युफॅक्चर आणि मार्केट बाय एनजेपी एप्रोटेक गुलमोहरनगर भारतवाडा,नागपूर' असा उल्लेख होता. 

एकूण ५८५ पोती अवैधरीत्या विक्रीसाठी आणल्याचे दिसले. खत विक्री करणारे विनायक खोब्रागडे यांच्याकडे पथकाने विचारणा केली असता वमोटेक ऑरगॅनिक (पनोली, गुजरात) या खताचे नमुने विश्लेषणासाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. 

या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांच्या फिर्यादीवरून आठ लाख १८ हजार ४१५ रुपयांचे ५८५ पोती बनावट खत व २५ लाखांचा ट्रक असा ३३ लाख १८ हजार ४१५ रुपयांचा मुद्देमाल मांडवी पोलिसांनी जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत