रेल्वे स्टेशनं परिसरातील मोठ्या प्रमाणात चालु असलेल्या जुगार अड्यावर पोलीसाची धाड
रेल्वे स्टेशनं परिसरातील मोठ्या प्रमाणात चालु असलेल्या जुगार अड्यावर परभणी पोलीसाची धाड
भाऊ सोनवणे यांच्या सहित 21आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
नगदी रक्कमी सहित एकूण 3 लाख 46 हजार 950 रुपयाचा मूदेमाल जप्त
महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,सुरज शहाणे,सेलू : सेलू शहर हे शिक्षनाचे माहेरघर म्हणून ओळखले जानारे आज जुगाराचे माहेरघर म्हणून ओळखले जात आहे एकेकाळी शिक्षणासाठी बाहेर गावावरून पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी सेलू शहर हे सुरक्षित समजत होते परंतु आज सेलू शहर व तालुका जुगार व दोन नंबर वाल्याचे दारू वाल्याचे माहेरघर बनलेली दिसून येतआहे जिल्हा स्तरावरील पोलीस प्रशासनातील मोठ्या अधीकार्य मार्फत एका महिन्यात दोन दोन तीन तीन कारवाया करीत सेलू चे नाव महाराष्ट्रत काय देशात गाजत आहे.
सेलू शहरातील गोविंदा लॉज समोरील लोकरत्नसेवाभावी संस्थेच्या होलमध्ये सुरु असलेल्या मनोरंजन केंद्रावर सहायक पोलीस निरीक्षक अविनाश कुमार याच्या पथकांणे रविवारी 22में 2022 रोजी रात्री 9:30च्या सुमारास धाड मारली यावेळी तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या 21जणांना ताब्यात घेतले त्यांच्या कडून 3लाख 46हजार 950रु मु्देमाल जप्त केला असून सोमवारी 23में2022 रोजी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी शिरीष पांडे,विठ्ठल गंगाधर अकात,भारत रावसाहेब घाडगे,सुनील माणिकराव राजूरकर,गणेश दत्तराव सवणे, सुनील अंकुश टाके,शेख जाफर शेख उस्मान,शिवाजी बाबुराव खेडकर, लक्षमन खटिंग,बाबासाहेब मुंजाजी मोळे,मो मनसब मो सुलतान, अशोक गुलाबराव खुपसे, मतीन खान चांद खान, विनोद सोपानराव,इब्राईम खान अमानउल्हा खान,दिगंबर गोविंद शेरे,बबन कचरू बाबा सिरसाट, उत्तम काशिनाथ डबाळे, दिनकर विनायक सोळके,भाऊराव विठ्ठलराव सोनवणे,शेख बडेखांब शेख काशिम हे 21जण तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले.
पोलिसांनी या सर्वाना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य 17मोबाईल 8दुचाकी,रोख रक्कम 3लाख 46हजार 950रुपयाचा मु्देमाल जप्त केला. घटनास्थळास सहायक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार,पो नि. गाडेवाड यांनी भेट दिली याप्रकरणी पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या फिर्यादीवरून सोमवार 23 में रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोउपनि. जटाळ, शेख उस्मान हे करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत