३१ ला शेतकर्याचा भव्य धडक ट्राॅक्टर मोर्चा आयोजन
३१ ला शेतकर्याचा भव्य धडक ट्राॅक्टर मोर्चा आयोजन
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, नरेंद्र मेश्राम,भंडारा : विधानसभा निवडणुकीत धानाला पाचही वर्ष रू ७००/- प्रति क्विंटल बोनस देऊ असे वचन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी ५ वर्षासाठी शासनाला निवडून दिले आहे, परंतु वचनपूर्ती न कर्ता या वर्षी बोनस गहाळ करून शेतकऱ्यांचा विश्वास घात झाला आहे, तसेच जि.प. च्या निवडणुकीच्या प्रचारात अनेक मान्यवर नेत्यांनी तेज तर्रार भाषणाच्या व्दारे डि.बी.टी. च्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना बोनस देण्यात येईल असे सुध्दा वचन दिले होते,
दिलेला वचन पुर्ण न केल्यामुळे शेतकरी बांधव अत्यंत आक्रोश मध्ये आहेत, पुन्हा आता रब्बी हंगामातील धान अत्यंत कमी क्विंटल प्रति एकर घेण्याचा विचार शासन घेत आहे, परंतु आम्ही शेतकरी झोपलेले नसून जागृत आहोत, जोपर्यंत डि.बी.टी.ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाही, २० क्विंटल प्रति एकर रब्बी हंगामातील धान घेण्याचे जाहीर होत नाही, तसेच ज्या मान्यवर शेतकऱ्यांचे ७/१२ आन लाईन झालेले नाहीत त्यांचे आन लाईन करण्याची साईट त्वरित सुरू होत नाही व पावसाळा तोंडावर असताना सुद्धा अद्याप धान खरेदी का सुरू झालेली नाही ?
ह्या सर्व अतिशय रास्त मागण्या असुन शासनाने त्वरित मान्य करावे यासाठी " किसान गर्जना " व्दारे भव्य धडक ट्राॅक्टर मोर्चा दिनांक ३१/५/२०२२ रोज मंगळवार ला तुमसर येथे काढण्यात येत आहे, करीता सर्व मान्यवर शेतकरी बांधवांनी या आंदोलनात हजारो ट्राॅक्टर घेऊन शेतकरी शक्ती कशी असते ते दाखवून द्यावे, मला माहित आहे भयंकर तापमान असल्यामुळे आपणास खुप त्रास होईल, परंतु आपण नेहमी उन्हात काम करणारे व देशाला अन्न पुरविणारे कष्टकरी शेतकरी आहोत,
म्हणून उन्हाच्या त्रासाची पर्वा न करता आणखी जिद्दीने भरल्या उन्हात रेकार्ड ब्रेक ट्राॅक्टर मोर्चा काढून शासनाला मागण्या मान्य करण्यास भाग पाडण्यासाठी हजारोच्या संख्येत नक्कीच उपस्थिती व्हावे हिच कडकडीची विनंती आहे तरी शेतकरी बाधंव यानी ट्र्कटर मोर्चा जास्तीत जास्त सखेंत उपथ्तित राहवे असे आवाहण राजेंद्र पटले यानी पञकान्वय कळविले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत