Breaking News

नांदा येथील आरोग्य केंद्रासाठी करणार आमरण उपोषण

नांदा येथील आरोग्य केंद्रासाठी करणार आमरण उपोषण


महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर :
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, तीन महिने उलटूनही अद्याप प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झालेले नाही.


माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या खनिज विकास निधीतून तब्बल ९ कोटी रुपये खर्च करून संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम करण्यात आले. ग्रामपंचायतीने तीन एकर जागा दिल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लागला. गेल्या तीन वर्षांपासून ताटकळत असलेले बांधकाम अखेर पूर्ण झाले. संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी शासनाने १५ पदांची मंजुरीही दिली; 


परंतु उद्घाटनाचा मुहूर्त मात्र प्रशासनाला मिळालेला नाही. याविषयी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे सचिव तथा नांदा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रत्नाकर चटप यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना तातडीने आरोग्य केंद्र सुरू करण्याविषयी मुंबई येथे निवेदन दिले. येत्या प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा चटप यांनी प्रशासनाला दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत