Breaking News

भरधाव ट्रकने पाच मजूरांना चिरडले, दोन मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू

चंद्रपूर शहरालगत भीषण अपघात, दोन मजूरांना ट्रकने चिरडले


महा गादामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : चंद्रपूर शहरालगत घुग्घुसवणी मार्गावर आयव्हीआरसीएल (IVRCL) या कंपनीचे महामार्ग डागडुजीचे काम सुरू असताना एका भरधाव ट्रकने मजुरांना चिरडले. यात दोन मजूर जागीच ठार तर एक गंभीर जखमी आहे.


घुग्घुस-चणी राज्य महामार्ग क्रमांक सातवरील पुनवट गावाजवळ कंपनीचे मजूर डागडुजी कार्यात व्यस्त होते. ट्रॅक्टर आणि पिकअपने माल वाहतूक करीत होते.


अश्यात वणी येथून येणाऱ्या भरधाव ट्रकने (MH 31 FC6399 ) पाच मजूरांना चिरडले, यात बेलोरा आणि मारेगाव येथील मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तीन मजूर गंभीररीत्या जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सिरपूर पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळ गाठले. जखमीना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मागील काही महिन्यात या मार्गावर लहान-मोठ्या अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत