शेवटी त्यां गुराख्याचे प्राण वाघाने घेतलेच
शेवटी त्यां गुराख्याचे प्राण वाघाने घेतलेच ..
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : मूल तालुक्यातील मारोडा गावातील एका गुराखीवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेतील मृतकाचे नाव गजानन गुरनूले वय 60 वर्षे रहिवासी मारोडा असे आहे.मृतक गजानन नेहमीप्रमाणे गावाजवळच्या शेतात बैल चारविन्यासाठी घेऊन गेला होता. संध्याकाळच्या वेळीस गावातील सर्व बैल घरी परत आले पण बैल राखणारा गजानन परत न आल्याने परिवारातील सदस्याने शोधाशोध सुरुवात केली. काही वेळा नंतर जिथे तो बैल चारावायला गेला त्या शेतात रात्री 8.30 च्या दरम्यान त्याची टोपी व थोड्या अंतरावर त्याचा ढोतर सापळला. त्याच दिशेनं शोधत सोमनाथ डोंगराच्या पायथ्याशी डोंगर देवीच्या जवळ गजानन चे मृतदेह सापडला.
सदर घटनेची माहिती वन विभागाला व तसेच पोलीसाना देण्यात आली. माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटना स्थळी पोहचून पंचनामा केले. सध्या मारोडा गावाच्या शेतशिवारात वाघाचे वावर वाढलं आहे. मृतक हा या पूर्वी सुध्या 2021च्या उन्हाळ्याच्या काळात त्याच्यावर वाघाचा हल्ला झाला होता.मात्र त्या हल्यात तो जखमी झाला आणि त्याचे प्राण वाचले होते. मात्र त्याच्यावर झालेल्या वाघाच्या हल्यात त्याचा मृत्यू झाला.त्यामुळे मारोडा गावात पुन्हा एकदा भीतीच वातावरण पसरले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत