Breaking News

करंजीच्या बौद्ध समाज मंडळाची कार्यकारणी गठित

करंजीच्या बौद्ध समाज मंडळाची कार्यकारणी गठित

अध्यक्षपदी धनराज निमगडे तर सचिवपदी संगिता लाटकर

प्रशांत भडके

धनराज निमगडे
                  

महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,गोंडपिपरी : गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावच्या बौद्ध समाज मडळाची कार्यकारणी नुकतीच गठित करण्यात आली.गुरुवारी(दि.२८) करंजी ह्या निवडी आटोपल्या.यात गावातील डाॕ.बाबासाहेब आंबेडकर वार्ड क्र.१ आणि वार्ड क्र.२ यांचेसह करंजी बसस्थानक परिसरातील बौद्ध समाजबांधवांची बैठक डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ पार पडली.यावेळी बहुप्रतीक्षेनंतर सर्व वार्डाचे एकत्रिकरण होत संपूर्ण गावातील एक म्हणून बौद्ध समाज मंडळ करंजीची जंबो कार्यकारणी गठित करण्यात आली.


यावेळी करंजी गावच्या बौद्ध समाज मंडळाच्या अध्यक्षपदी धनराज निमगडे तर सचिवपदी संगिता लाटकर यांची निवड झाली आहे.उपाध्यक्षपदी चेतन बक्षी,कोषाध्यक्षपदी प्रशांत भडके तर सहसचिवपदी मारोती गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.ईतर सदस्यांमध्ये सुशिपाल लाटकर,सतिश खोब्रागडे,अल्का निमगडे,निर्मला लाटकर यांचा समावेश आहे.यावेळी बैठकिदरम्यान बौद्ध समाजातील जेष्ठ सदस्य म्हणून गंगाराम रायपूरे आणि आनंदराव देवगडे यांची बौद्ध समाज मंडळाच्या सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे.या सर्व निवडी एकमताने पार पडल्या हे विशेष.यानंतर सर्व समाजबांधव जयंतीउत्सव,कार्यक्रम आणि सोहळे एकत्रितपणे साजरे करण्याचे सर्वानूमते ठरले.यावेळी शेकडो बौद्ध बांधव आणि महिला भगिनींची उपस्थिती होती.उपस्थितांनी नवनियुक्तसर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत