Breaking News

ग्रामपंचायत नळाचे पिण्याचे पाणी फक्त टिल्लूपंपालाच मिळते.

सामान्य नळधारकाकडून वसूली : कारवाई करण्यास असमर्थ



महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, संतोष रोकडे,अर्जुनीमोरगाव : तालुक्यातील येरंडी/बाराभाटी या गावात अनेक वर्षापासून ग्रामपंचायतची नळ योजना सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून खुलेआम टिल्लू पंप लावण्यात आले आहे. याप्रकामूळे टिल्लू पंप लावणारे वगळता बाकी सामान्य नळधारकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. हा अजब करभार येरंडी गावात सुरू आहे, टिल्लू पंप वाल्यांना मिळते पाणी बाकीच्यांनी दयावी वसूली. असा नवा निर्देश असावा. 

सदर योजनेच्या नळांना विविध बहाणे सांगत व मनमर्जी कारभार करत पाणी सोडणारा हा नियमाने व दररोज पुरेसा सुरळीत पाणी सोडत नसल्याने, सामान्य नळधारकांना पाणी मिळत नसल्याचे नळधारक सांगतात. नळ सुरू करुन बाहेर जाणे, लक्ष न देणे, टिल्लूपंप वाल्यांना न बोलणे, एकावेळी दोन्ही वाल सुरु करणे, नळ सोडून जलकुंभ स्थळी नसणे, याप्रकारामूळे नागरिकांना पुरेसा पाणी मिळत नाही. गावातील पाणी समाधानकारक व पुरेसा गावातीलच लोकांना मिळत नाही. तरी ग्रामपंचायचे अधिकारी व पदाधिकारी कधीच लक्ष घालत नाही आणि टिल्लू पंप धारकांवर कारवाई करत नाही. 

      सदर गावात या योजनेच्या नळांना पाणी पुरवठा व्हावा म्हणून एक वर्षापूर्वी रिडींग मीटर लावण्यात आले पण याचाही काहीच फायदा होत नाही. हे मीटर शोभेचे वस्तू ठरले आहे.  पाणी सुरळीत होत नसल्याची तक्रार अनेकदा करण्यात येते पण स्थानिक शासन निद्रावस्थेत असते. 

पाणी सोडणारा आपली जबाबदारी पार पाडत नसेल तर त्याला त्या कामावरून कमी करून त्याऐवजी दुसऱ्याची निवड करावी असे ही नागरिकांनी सांगितले. याकडे ग्रामपंचायत कानाडोळा करत आहे. पाणी सोडणारा नळ सुरू करुन जलकुंभाजवळ राहत नसल्याचे अनेकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे हा प्रकार होत आहे. गावातील पाणी गावक-यांनाच मनमर्जी प्रकाराने पुरेशा स्वरुपात मिळत नाही. 

तसेच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या गावात टिल्लू पंपावाले यांचा चांगलाच धुमाकूळ सुरू आहे. पण ग्रामपंचायत काहीच करत नाही तर उलट टिल्लू पंपवाल्यांनाच सहकार्य करत असल्याचे समजते. गावातील काही पदाधिकारीही टिल्लपंप वापरत असावे म्हणून कारवाई होत नाही. हा धुमाकूळ वार्ड क्रमांक तीनमध्ये खुलेआम चालतो. एका टिल्लूपंपामुळे नऊ नळ धारकांना पाणी मिळत नाही. कुणी बोलले तर भांडण करतात असाही प्रकार होत असल्याचे सांगितले जाते. 

सदर गावात टिल्लूपंपाच्या वापरामुळे नळांना पाणी मिळत नाही तर नळाच्या तोट्या काढल्या जातात, नंतर काम झाले की त्या तोट्या बंद केल्या जात नाही. त्यामुळे पाण्याचा वापर योग्य होत नाही. सामान्य नळधारकांना पाणी पिण्यास मिळत नाही तरी खुलेआम टिल्लूपंपा लावणारे महाशय मोटारसायकल धूणे, पाणी वाया घालविणे असलेही प्रकार केल्याचे बोलले जाते.सांगितले जाते

अनेकदा पाणी येत नाही असे सांगितले की म्हणतात दोन तास नळ सुरु केल्या जातात पण त्या दोन तासापैकी किमान अर्धा तासही पाणी पुरवठा होत नाही. अडचणी संबधी विचारणा केल्यावर उलटसुलट उत्तर देऊन बोलण्यास टाळाटाळ केल्याचे नागरिक सांगतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत