Breaking News

राजीव नगर येथे माजी मंत्री बडोले यांच्या हस्ते भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे अनावरण

 राजीव नगर येथे माजी मंत्री बडोले यांच्या हस्ते भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे अनावरण



महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी,संतोष रोकडे,अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील राजीवनगर येथे बुद्धपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर माजी सामाजिकन्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते भगवान बुद्ध,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.यावेळी लक्ष्मीकांत धानगाये,शारदा बडोले,नगरसेवक यशकुमार शहारे,राधेश्याम भेंडारकर, सुशील लांडे,मीना शहरे उपस्थित होते.

माजी मंत्री बडोले यांच्या प्रयत्नाने राजीवनगर येथे भीमशक्ती बौद्ध समाजासाठी सभागृहाचे बांधकाम मंजूर झाले होते. यावेळी बडव्यांनी उपस्थितांना भगवान बुद्धांनी सांगितलेला मार्ग हाच मानवाच्या कल्याणाचा मार्ग आहे.बुद्धानी प्रज्ञा, शील, करुणा, मानवता आणि शांतीचा संदेश दिला. 

प्रत्येकाने बुद्धाचा धम्म आचरणात आणावा.मानव कल्याणासाठी मैत्री हा भाव ठेवून सदाचारी वागणूक असावी.बौद्ध समजणार्‍या प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा आचरणात वापर करतो काय? याचे चिंतन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार विलास रामटेके यांनी  केले.यशस्वीतेसाठी भीमशक्ती बौद्ध समाज बांधवांनी आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत