जिवतीच्या दवाखान्यातील कर्मचारी मोकाट
जिवतीच्या दवाखान्यातील कर्मचारी मोकाट
खोब्रागडे रुग्णांशी "खालच्या" भाषेत बोलतो
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,शेख हक्कानी, जिवती : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती हे सध्या नुकतेच वादाच्या भोऱ्यातून बाहेर पडते न पडते अजुन एका प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे.सरकारी दवाखाना म्हटले की गोर गरीब लोकांना मोफत उपचार मिळावा म्हणून आशा असते म्हणून ते सरकारी दवाखाना कडे जातात.
मात्र सरकारी दवाखान्यात रक्त तपासणी विभागात कार्यरत असलेले खोब्रागडे हे अशिक्षित गरीब महिला रुग्णांना लघवी तपासणी करीता गेल्यानंतर त्यांना खालच्या भाषेत बोलतो.एका महिलेला त्यांनी "भांड भरून" लघवी आणण्यासाठी सांगितले.त्यांनी लघवी आणण्यासाठी कोणतेही साधन दिलं नाही.त्या महिलेने बाहेरून एक बॉटल शोधून लघवी आणल्या नंतर त्या महिलेला हा खोब्रागडे म्हणाले "माझ्यासाठी चहा आणलीस का?" असे बोलून लज्जित केले.
मी तुझ्या बापाचा नोकर नाही.अशा पद्धतीने बोलून त्याने महिलेला दवाखान्यातून पाठवले सदर महिलेने घरी ही बातमी सांगितल्यावर तालुक्यातील पत्रकार संघ सरकारी दवाखान्यात जाऊन मेडिकल अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता खोब्रागडे यांना जाब विचारला असता त्यांनी माझी चूक झाल्याचे कबूल केले.शिवाय त्या महिलेची माफी मागितली.
मेडिकल अधिकारी यांना लेखी स्वरूपात तक्रार द्या मी त्यांच्यावर कार्यवाही करतो असे सांगितले.आणि असे वागणे चुकीचे आहे असे होऊ नये यासाठी मी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले .यावेळी तालुका पत्रकार शबिर भाई जहागीरदार,जय विदर्भ पार्टीचे नेते सुदाम राठोड,विनोद चव्हाण, शिवसेना नेते शेख हकाणी,रुग्णसेवक जिवन तोगरे आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत