Breaking News

कालव्यात बुडून युवकाचे निधन

 कालव्यात बुडून युवकाचे निधन


अर्जुनी-मोर संतोष रोकडे : अर्जुनी-मोर तालुक्यातील इटियाडोह धरणाच्या मुख्य कालव्यात बुडून मृत्यू झाला याबाबत सविस्तर वृत्त असे की अर्जुनी-मोर तालुक्यातील बुराई नं एक येथे दिनांक 10 मे रोजी लग्नकार्याला हितेश यशवंत भोयर वय15 राहणार पिंपळगाव हलबी तालुका वडसा जिल्हा गडचिरोली हा आलेला होता गावाच्या बाजूने धरणाचा मुख्य नहरा कडे फिरायला गेला.

 वाहत्या पाण्यात आंघोळ करण्याच्या उद्देशाने पाण्यात उतरला व वाहून गेला ती घटना दिनांक 10 मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली शोधकार्य दरम्यान त्याचे प्रेत दिनांक 11 मे रोजी साडेबारा वाजेच्या दरम्यान मिळून आले पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खोटेले करीत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत