प्रेयसीवर चाकूहल्ला केल्यावर स्वतःही जखमी झाला प्रियकर
प्रेयसीवर चाकूहल्ला केल्यावर स्वतःही जखमी झाला प्रियकर
माणिकगड किल्लावरील घटना
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी संतोष मडावी चंद्रपूर : कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील गडचांदूर नजिकच्या पर्यटनस्थळ असलेल्या माणिकगड किल्ला वर फ़िरायला गेले तिथे प्रेमाच्या आणाभाका घेत असताना प्रेयशीने लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावल्याने प्रियकरचा राग अनावर झाला यात चाकू हला करुन प्रेयशिला जखमी केले व स्वतःहच्या शरीरावर त्याच चाकूने वार करुन स्वतही जखमी झाला ही घटना 23 मे ला दुपारी एक वाजतचेदरम्यान घडली जख्मिन चंद्रपुर येथील शासकीय रूग्णालयात भरती करण्यात आले असुन त्यांची प्रकृती बरी असल्याचे समजते
प्राप्त माहितीनुसार गडचांदुर येथील एक प्रेमि प्रेमिका वय साधारण 21 वर्ष गडचांदूर येथील माणिकगड किल्ह्यावर गेले असता प्रेयशिला लग्न करण्याचा तगादा लावला परंतू प्रेयशीने साफ नकार दिल्याने प्रियकराला राग अनावर झाला यात सोबत आणलेल्या चाकूने तीच्या गळ्या वर चकुने वार केला व प्रियकराने स्वता च्या शरीरावर त्याच चाकूने वार करुन दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले.काही पर्यटक तिथेच आले असताना या दोघाना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहुन त्यानी तिथे काम करनर्या वन.मजुरला ही माहिती दीली त्यांच्या साहाय्याने गडचांदूर येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु परस्तिथी पाहुन चंद्रपुरला हलविण्यात आले.माणिकगड किल्हा हा जिवती पोलिस स्टेशन हदीत येत असल्याने याची माहिती जिवती पोलिसांनादेण्यात आली घटनेची माहिती मिळताच घटनास्थलि पोहचले प्रियकरा विरुध्द 307 कलम दाखल करुन पुढिल तपास सपोनी जगताप करित आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत