विरूर स्टे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र त्वरित सुरू करा :- आम आदमी पक्ष
विरूर स्टे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र त्वरित सुरू करा :- आम आदमी पक्ष राजुराच्या वतीने मागणी
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,राजुरा : तालुका आरोग्य अधिकारी राजुरा यांना विरूर रेल्वे स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तयार असून उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहे. आरोग्य केंद्र चालू न झाल्याने त्याभागातील लोकांना आरोग्य सेवे पासून वंचित रहावे लागत आहे.ही बाब निदर्शनास आणून दिली.नुकतीच पावसाळ्याला सुरूवात होत असून आरोग्य केंद्र सुरू न झाल्याने त्याभागातील लोकांना विनाकारण राजुराला यावे लागणार आहे.
यामुळे त्यांना विनाकारणचा त्रास व आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.याबाबत विचारणा केली असता अजून पर्यंत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात न आल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवतो आहे.आरोग्य कर्मचा-यांची संख्याच कमी असल्याने केंद्र सुरू करण्यात अडचणी येत आहेत. याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.असे सांगितले जाते आहे.
बऱ्याच दुर्गम भागात आरोग्य केंद्राच्या इमारती उभारून ठेवल्या आहेत.परंतु कर्मचारी वर्गच उपलब्ध नसल्याने या इमारती शोभेच्या वस्तू झालेल्या आहेत.या बाबतची दखल चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी घेणे भाग आहे.याची दखल घेऊन दुर्गम भागातील सर्वच आरोग्य केंद्रे युद्ध पातळीवर चालू करण्याचे काम हे राज्य सरकारने पुढाकार घेऊन केले पाहिजे अशी जनतेची व आम आदमी पक्षाची मागणी आहे.
यासाठीचे निवेदन आरोग्य अधिकारी राजुरा यांना सुपूर्द करण्यात आले.आरोग्य अधिकारी उपलब्ध नसल्याने हे निवेदन एम.जी.टेकाम(एच.ए.)यांना देण्यात आले.लवकरच आरोग्य केंद्रांचे उद् घाटन होऊन हे केंद्र जनतेच्या सेवेसाठी खुले होईल असे सांगण्यात आले.तालुका अध्यक्ष रोशन येवले, कोषाध्यक्ष रामदास धानोरकर,युवा आघाडी अध्यक्ष साईनाथ भालेराव,शेतकरी युवा आघाडीचे स्वप्नील कोहपरे आणि मिलिंद गड्डमवार यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत