जबरदस्ती लग्न करण्यासाठी विद्यार्थिनीचे अपहरण करून धमकी
जबरदस्ती लग्न करण्यासाठी विद्यार्थिनीचे अपहरण करून धमकी
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,नागपूर ; जबरदस्ती लग्न करण्यासाठी विद्यार्थिनीचे अपहरण करून धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. सक्करदरा पोलिसांनी अपहरण तसेच धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
अंकित उमाशंकर उसंतबरसे (रा.वाठोडा) असे आरोपीचे नाव आहे. त्याची २० वर्षांच्या विद्यार्थिनीसोबत अनेक दिवसांपासून मैत्री आहे. अंकित गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हेही दाखल आहेत. तो काही दिवसांपासून विद्यार्थिनीवर लग्नासाठी दबाव टाकत होता. विद्यार्थिनी आणि तिचे कुटुंबीय लग्नासाठी नकार देत होते. तरीदेखील अंकित तिच्या मागे लागला होता.
मंगळवारी रात्री अंकित विद्यार्थिनीच्या सक्करदरा ठाण्याच्या परिसरातील घरी गेला. त्याने विद्यार्थिनीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून आपल्या वाठोडा येथील घरी नेले. तेथे त्याने माझ्याशी लग्न कर असे म्हटले. विद्यार्थिनीने नकार दिला असता त्याने तिला आपहरण करून तिला मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे विद्यार्थिनीचे कुटुंबीय घाबरले. त्यांनी वाठोडा पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी विद्यार्थिनीची विचारपूस केली. विद्यार्थिनीने जबरदस्ती अंकितने अपहरण करून लग्नासाठी दबाव टाकल्याचे सांगितले. वाठोडा पोलिसांच्या सूचनेवरून सक्करदरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अंकितला अटक केली. त्याच्याविरुद्ध अपहरण, मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत