त्या दुचाकीमुळे झाला मिनी बसचा अपघात
त्या दुचाकीमुळे झाला मिनी बसचा अपघात
यामुळे भरधाव खासगी बस अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या कडेला उलटली. यात बसमधील १५ प्रवासी जखमी झाले. अपघाताची ही घटना खापरखेडा पारशिवनी मार्गावरील सिंगोरी गावाजवळ काल दुपारी २:०० वाजताच्या सुमारास घडली.
नागपूर मानकापूर परिसरातील २५ जण ईद साजरी करण्याकरिता एमएच ४० / एटी क्रमांकाच्या स्कूल बसने पारशिवनी तालुक्यातील काबूल कंधार येथे जात होते. अशात सिंगोरी गावाजवळ पारशिवनीकडून एमएच ४० / बीएस-०८४१ क्रमांकाची दुचाकी खापरखेडाकडे जात असताना ओव्हरटेक करण्याच्या नादात स्लिप होऊन रोडवर पडली. दरम्यान वेगाने येणारी बस त्या दुचाकीवरून गेल्याने अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटली.
दुचाकीस्वाराने लगेच घटनास्थळावरून पळ काढला. या बसमध्ये २५ प्रवासी होते. त्यातील १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. काही जखमींना कामठी व नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले तर काहींना पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने यात कुणीही गंभीर जखमी झाले नाही. याप्रकरणी पारशिवनी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शना मध्ये पारशिवनी पोलीस समोरची कारवाई करीत आहे.
मिनी बस उलटली; अनेकजण जखमी
रामटेक विधानसभे अंतर्गत येणाऱ्या पारशिवनी तालुक्यातील काबुल कंधार दर्ग्यात जाणारी एक मिनि बस पलटल्याची माहिती मिळाली आहे. बसमध्ये बसणाऱ्यांपैकी ६ ते ८ जण जखमी असून हा अपघात काही वेळापूर्वी खापरखेडा-पारशिवनी मार्गावर असणाऱ्या व गावाजवळ घडला असल्याचे कळते. बसमध्ये असणारे सर्व प्रवासी नागपूर येथील मानापुर या भागाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेबाबतची संपूर्ण माहिती स्थानिक पोलिसांद्वारे मिळाल्यानंतर प्राप्त होऊ शकेल.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत