महानगरात संघटनात्मक बांधणीवर भर - डॉ.मंगेश गुलवाडे
महानगरात संघटनात्मक बांधणीवर भर - डॉ.मंगेश गुलवाडे
बी.बी.सिंग,उमेश आष्टनकर व मोरेश्वर खैरे यांची महानगर भाजप च्या सचिवपदी नियुक्ती
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर मध्ये संघटनात्मक बांधणीचे कार्य सुरू आहे त्यामध्ये कार्यकर्त्यांच्या विविध नेमणुका करण्यात येत आहे त्यातीलच महानगर चंद्रपूर सचिव पदी बी.बी.सिंग,उमेश आष्टनकर व मोरेश्वर खैरे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की चंद्रपूर महानगरात संघटनात्मक रचना पूर्ण करण्याचे कार्य सुरू असून पाचही मंडळातील व महानगरातील विविध नियुक्त्या करण्यात आलेल्या असून महानगरातील संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात येत आहे येणाऱ्या काळात अधिक गतीने कार्यकर्ते तथा पदाधिकारी कार्य करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रसंगी नियुक्ती झालेल्या पदाधिकारी यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले सदर नियुक्ती कार्यक्रम प्रसंगी रामजी लखिया,संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, महामंत्री ब्रिजभूषण पाझारे,सुभाष कासनगोटटूवार,रवींद्र गुरणुले,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार,रवी लोणकर,दिनकर सोमलकर,विठ्ठल डुकरे,गिरीधर येडे,अमित निरंजने,आकाश लकापूरवार, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती...

.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत