Breaking News

सुमठाणा सेवा सहकारी संस्था निवडणुकीत ग्रामीण विकास मंच चा दणदणीत विजय

सुमठाणा सेवा सहकारी संस्था निवडणुकीत ग्रामीण विकास मंचचा दणदणीत विजय


महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, खेमचंद नेरकर, वरोरा : 
तालुक्यातील सुमठाणा येथील सेवा सहकारी संस्थेची निवडणूक 21 मे 2022 ला पार पडली.या निवडणुकीत ग्रामीण विकास मंच व शेतकरी विकास पॅनल असे दोन गट निवडणूक लढले.यामध्ये 13 पैकी 11 सदस्य निवडून आणून ग्रामीण विकास मंच नी आपला विजयी गड राखला.निवडणूक अधिकारी म्हणून चव्हाण साहेब यांनी काम पाहिले.

ग्रामीण विकास मंच च्या विजयी उमेदवारांमध्ये नरेश संजय शामराव काटकर,नरेश रामराव बोबाटे,विनायक चंपत गराटे, प्रमोद किसना दडमल,दिनेश वामन बोबाटे,देवराव सदाशिव मडावी,विक्रात नथ्थु वैद्य ,तुकाराम विठोबा गरमडे, रमेश मोहन महाकाळकर,बेबीताई आनंद तिजारे,शकुंतला लक्ष्मण हरणे यांचा समावेश आहे.निवडणूक यशस्वितेसाठी उमेश हरणे,शामराव काटकर,रामदास बालबुद्धे,बाला बालबुद्धे,विठ्ठल ढगे,मोहन महाकाळकर, गजानन मुंगळे,प्रकाश लोणकर यांनी मोलाची कामगिरी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत